आरोग्य विभागाच्या तरतुदीत १६ टक्के वाढ

bmc, mumbai municipal corporation, Tree Lights, Citing Environmental Concerns, tree lights in mumbai, mumbai tree lights, bmc Orders Removal of Tree Lights, mumbai news, environment news, dangerous for insects, bmc news, marathi news,
झाडांवरील रोषणाई सात दिवसात हटवा, पालिका प्रशासनाचे विभाग कार्यालयाना आदेश
Traffic congestion, Divisional Commissioner office area,
विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील वाहतुकीचा बोजवारा, वाहनचालकांना पाच ते दहा किलोमीटरचा वळसा
Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी
property developers Kalyan seized
कल्याणमधील २६ विकासकांच्या ११४ कोटींच्या मालमत्ता जप्त, ८८ हजार ८७६ चौरस मीटरच्या मालमत्तांचा लिलाव

करोनाशी झुंजणाऱ्या आरोग्य क्षेत्राला अर्थसंकल्पाने दिलासा दिला आह़े  २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी ८६,२००़ ६५ कोटींची तरतूद करण्यात आली असून, ती २०२१-२२ च्या अर्थसंकल्पातील तरतुदीच्या तुलनेत १६ टक्के अधिक आह़े  मानसिक आरोग्य कार्यक्रमाला बळकटी आणण्यासाठीही अर्थमंत्र्यांनी अनेक घोषणा केल्या़

आरोग्य क्षेत्रासाठी तरतूद करण्यात आलेल्या ८६,२००़६५ कोटींपैकी ८३,००० कोटी आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाला देण्यात येणार असून, ३२०० कोटींची तरतूद आरोग्य संशोधन विभागासाठी करण्यात आली आहे, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले. मानसिक आरोग्य सेवा दर्जेदार होण्यासाठी ‘राष्ट्रीय दूरस्थ मानसिक आरोग्य कार्यक्रम’ राबवण्यात येणार आहे. या योजनेद्वारे मानसिक आरोग्य समुपदेशन आणि निगा सुविधा पुरविण्यात येणार आहेत़  या योजनेच्या माध्यमातून २३ दूरस्थ मानसिक आरोग्य केंद्रे उभारण्यात येणार असून, बंगळूरु येथील राष्ट्रीय मानसिक आरोग्य आणि चेताविज्ञान विभाग हे विभागीय केंद्र असेल आणि आंतरराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान संस्था- बंगळूरु या केंद्रांना तंत्रज्ञान पुरवठा करणार आहे, असे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केल़े .

‘नॅशनल डिजिटल हेल्थ इकोसिस्टिम’

’केंद्र सरकारने ‘नॅशनल डिजिटल हेल्थ इकोसिस्टीम’ योजना तयार केली असून त्याद्वारे आरोग्यसंदर्भातील माहितीचे व्यासपीठ खुले करण्यात येणार आहे.

’डिजीटल नोंदणीकृत आरोग्यसेवा पुरवठादार, आरोग्य सुविधा यांसदर्भातील माहिती नागरिकांना उपलब्ध होईल. नागरिकांना अनोखा आरोग्य ओळख क्रमांक देण्याबरोबरच सरकारच्या आरोग्य योजनांची व्यापकता वाढविण्याचा प्रयत्न या उपक्रमात करण्यात येईल, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

तरतुदीत वाढ

’केंद्रीय क्षेत्र योजना आणि प्रकल्पांच्या तरतुदीत १०,५६६ कोटींहून १५,१६३ कोटींपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

’केंद्रीय क्षेत्र योजनेचा भाग

असलेल्या प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेसाठी एक लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या अर्थसंकल्पात ही तरतूद ७० हजार कोटींची होती.

’राष्ट्रीय डिजीटल आरोग्य आयोगासाठी २०० कोटींची  तरतूद करण्यात आली आहे.

यापूर्वी ही तरतूद केवळ ३० कोटी होती.

’राष्ट्रीय आरोग्य आयोगासाठी २०२१-२२च्या अर्थसंकल्पात ३६,५७६ कोटींची तरतूद होती. ही तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात ३७,००० कोटींपर्यंत वाढवण्यात आली आहे.

’स्वायत्त संस्थांसाठी १०,०२२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. २०२१-२२च्या अर्थसंकल्पात ही तरतूद ८५६६ कोटींची होती.

’वैधानिक आणि नियामक संस्थांसाठी गेल्या आर्थिक वर्षांत ३१५ कोटींची तरतूद होती, ती आता ३३५ कोटींची करण्यात आली आहे.

’जिल्हा आरोग्य रुग्णालयांसाठी केंद्र  सरकारने ४,१७७ कोटींच्या निधीची तरतूद केली आह़े