scorecardresearch

Union Budget 2023 : ज्येष्ठ नागरिकांना दिलासा, ‘या’ योजनेत दुप्पट गुंतवणूक करता येणार, महिलांसाठी नवी योजना

India Budget 2023 Updates : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करतेवेळी बचत योजनेशी संबंधित नवीन घोषणा केल्या. याचदरम्यान त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना देखील दिलासा दिला आहे.

Union Budget 2023-24 Updates
India Budget 2023 Updates : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करतेवेळी बचत योजनेशी संबंधित नवीन घोषणा केल्या. याचदरम्यान त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना देखील दिलासा दिला आहे. (PC : PTI)

Union Budget 2023 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज भारताचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी बचत योजनेशी संबंधित नवीन घोषणा केल्या. याचदरम्यान त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना देखील दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिक बचत योजनेची (SCSS -Senior Citizen Savings Scheme) कमाल ठेव मर्यादा ३० लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. तर दुसऱ्या बाजूला एकल खात्यासाठी (सिंगल अकाऊंट) पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना ९ लाख रुपये आणि संयुक्त खात्यांसाठी (जॉईंट अकाऊंट) १५ लाख रुपये इतकी करण्यात आली आहे.

अर्थमंत्री सीतारमण यांनी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (MSSC) योजना २ वर्षांच्या कालावधीसाठी प्रस्तावित केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना अंशतः पैसे काढण्याची सुविधा मिळेल. तसेच दोन वर्षांसाठी ७.५ टक्के व्याजाने २ लाख रुपयांची ठेव सुविधा प्रदान केली जाईल.

मोदी सरकारचा अखरेचा अर्थसंकल्प

नरेंद्र मोदी सरकारचं हे ५ वर्षांच्या कार्यकाळातलं अखेरचं पूर्ण बजेट आहे. तर निर्मला सीतारमण या स्वतंत्र भारतातल्या सलग ५ अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पाचव्या अर्थमंत्री ठरल्या आहेत. सीतारमण यांच्याव्यतिरिक्त अशी कामगिरी अरुण जेटली, पी. चिदंबरम, यशवंत सिन्हा, मनमोहन सिंह आणि मोरारजी देसाई यांनी केली आहे.

हेही वाचा : विश्लेषण: अर्थसंकल्पात सामान्य करदात्यांसाठी नेमकं काय? करपात्र उत्पन्नाची मर्यादा बदलली, पण त्याचा फायदा कुणाला होणार?

काय महाग होणार?

सोने, चांदी आणि प्लॅटिनम
सिगारेट (कस्टम ड्युटी वाढून आता १६ टक्के इतकी झाली आहे.)
देशी किचन चिमणी

हेही वाचा : Budget 2023 : सात लाखांच्या उत्पन्नावर आयकर नाही, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची महत्त्वाची घोषणा

काय स्वस्त होणार?

मोबाईल फोन आणि कॅमेरा लेन्स
एलईडी टीव्ही आणि बायोगॅसशी संबंधित उपकरणं
इलेक्ट्रिक कार, खेळणी आणि सायकल

मराठीतील सर्व Budget 2023 ( Budget ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-02-2023 at 14:07 IST
ताज्या बातम्या