मुंबई:राज्याची महसुली तूट तब्बल ८० हजार कोटींच्या घरात गेल्याची सूत्रांची माहिती असून ही तूट भरून काढण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारसमोर आहे. ही तूट कमी दाखविण्यासाठी दरवर्षीप्रमाणे आकडय़ांचा खेळ खेळला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस आज, गुरुवारी विधानसभेत आपला पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. ढिसाळ नियोजन आणि वारेमाप लोकप्रिय घोषणांमुळे राज्याची आर्थिक स्थिती नाजूक वळणावर येऊन ठेपली असताना ‘महाअर्थसंकल्पा’त सर्व समाज घटकांना खुश कसे केले जाणार याबाबत उत्सुकता आहे. गतवर्षी तत्कालीन उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी २४ हजार ३५३ कोटींच्या तुटीचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यावेळी राज्याचे महसूली उत्पन्न ४ लाख तीन हजार ४२० कोटी गृहीत धरण्यात आले. प्रत्यक्षात गेल्या नोव्हेंबपर्यंत ते जेमतेम दोन लाख ५१ हजार ९३४ कोटी इतकेच झाले. त्यातच गेल्या जुलैमध्ये राज्यात सत्ताबदल झाला आणि त्यानंतर खर्चात वारेमाप वाढ झाली. हे सर्व गृहीत धरल्यास महसुली तूट आणखी वाढू शकते, अशी माहिती वित्त खात्यातील सूत्रांनी दिली. सरकारने अपेक्षित धरलेले उत्पन्न, प्रत्यक्षात गोळा झालेला महसूल व झालेला खर्च लक्षात घेतला तर तुटीचा आकडा ८० हजार ९०० कोटींच्या घरात असण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व अर्थसंकल्प २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The revenue deficit of the state is about 80 thousand crores mumbai amy
First published on: 09-03-2023 at 04:16 IST