Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज २०२३-२४ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून होते, कारण मोदी सरकार २.० चा हा अखरेचा अर्थसंकल्प होता. त्यामुळे या अर्थसंकल्पातून सरकार गरीब, शेतकरी, मध्यमवर्गीय, व्यावसायिक इत्यादी समाजातील सर्वच घटकांना मोदी सरकार काय देणार, याची सर्वांना उत्सुकता होती. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांकडून टीका सुरू आहे. दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना, तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात पंजाबचा चित्ररथ नव्हता. त्यात आता केंद्रीय अर्थसंकल्पातही पंजाबला विशेष काही न मिळाल्याने पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “प्रजासत्ताक दिनातून अगोदरच पंजाब गायब होता आणि आता अर्थसंकल्पातूनही गायब झाला आहे.”

हेही वाचा – Union Budget 2023 : “पुढीलवेळी हिंदी जर बोलता येत नसेल तर दुसऱ्याकडून तो अर्थसंकल्प सादर करा, नाहीतर…” बच्चू कडूंचं विधान!

याचबरोबर “सीमावर्ती राज्य असल्याने आम्ही बीएसएफच्या अद्यावतीकरण, आधुनिकीकरण, ड्रोनविरोधी यंत्रणेसाठी केंद्राकडे एक हजार कोटींची मागणी केली होती, मात्र अर्थसंकल्पात याविषयी काहीच बोललं गेलं नाही.” असं भगवंत मान म्हणाले आहेत.

याशिवाय भगवंत मान म्हणाले, “आम्ही अमृतसर, भटिंडाहून दिल्लीसाठी वंदे भारत रेल्वे चालवण्याची मागणीही केली होती. पराळी जाळण्याच्या व्यवस्थापनासाठी १५०० रुपये प्रति एकर मागितले होते, मात्र यावरही काहीच मिळाले नाही. शेतकऱ्यांसाठी एमएसपीची घोषणाही केली नाही, पंजाबबरोबर हा अन्याय ठीक नाही.”

मराठीतील सर्व अर्थसंकल्प २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Union budget 2023 earlier punjab was missing from republic day now punjab is missing from the budget msr
First published on: 01-02-2023 at 21:28 IST