Budget 2023: केंद्रीय अर्थसंकल्प लवकरच सादर केला जाणार आहे. अर्थसंकल्पामध्ये आर्थिक वर्षातील केंद्राचा महसूल, खर्च यांचा समावेश असतो. उत्पन्नाचे इतर स्रोत आणि इतर खर्च यांचाही यात समावेश असतो. यावर्षीचा म्हणजेच २०२३ चा अर्थसंकल्प कधी सादर केला जाणार आहे आणि तो कसा तयार केला जातो जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Budget 2023 : निर्मला सीतारामन १ फेब्रवारीला अर्थसंकल्प मांडणार; ३१ जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन

केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ ची तारीख

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान दरवर्षी १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जातो. पण यावर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीला सुरू होणार असून ते ८ एप्रिलला संपण्याची शक्यता आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ ची वेळ

२०२३ – २०२४ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प लोकसभेमध्ये १ फेब्रुवारी (बुधवारी) सकाळी ११ वाजता सादर केला जाईल.

अर्थसंकल्प कोण सादर करते

गेल्यावर्षीप्रमाणे २०२३ – २०२४ चा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमन १ फेब्रुवारीला सादर करतील. २०२३ – २०२४ चा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचा हा सलग पाचवा केंद्रीय अर्थसंकल्प असेल. अर्थसंकल्प सादर करण्यात येण्याच्या एक दिवस आधी ३१ जानेवारीला निर्मला सीतारमन आर्थिक सर्वेक्षण सादर करतील.

Budget 2023: नोकरदारांना अर्थसंकल्पातून काय मिळणार? करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढणार?

अर्थसंकल्प कसा तयार केला जातो?

अर्थसंकल्प सादर करण्याच्या ६ महिने आधीपासून म्हणजे ऑगस्ट- सप्टेंबरपासून अर्थसंकल्प तयार करण्यास सुरुवात केली जाते. ही खुप मोठी प्रक्रिया असते. यात तज्ञांचा सल्ला, नियोजन, अंमलबजावणी या गोष्टींचा समावेश असतो.

केंद्रीय वित्त मंत्रालय आणि नीती आयोग, इतर संबंधित मंत्रालयांशी सल्ल्याने अर्थसंकल्प तयार केला जातो. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर नवे आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी म्हणजेच १ एप्रिलपूर्वी दोन्ही सभागृहांकडून तो मंजूर केला जातो.

मराठीतील सर्व अर्थसंकल्प २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Union budget 2023 know expected date time who will present it how it is prepared pns
First published on: 04-01-2023 at 17:07 IST