India Budget 2025 Live Updates: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. त्यात नव्या करप्रणालीची घोषणा त्यांनी केली. त्यानुसार १२ लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याची मोठी घोषणा निर्मला सीतारमण यांनी केली आहे. त्याचसोबत पुढील सर्व टॅक्स स्लॅब्जमध्येही त्यांनी बदल केले असून त्यानुसार करदात्यांना भराव्या लागणाऱ्या करात सूट मिळाली आहे. त्यामुळे करदात्यांसाठी हा अर्थसंकल्प मोठा दिलासा देणारा ठरल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. मात्र, त्याचवेळी विरोधकांकडून हा अर्थसंकल्प म्हणजे दिल्ली विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून केलेल्या घोषणा असल्याची टीका केली जात आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पावरील राहुल गांधींच्या विधानावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, “काँग्रेसने या अर्थसंकल्पावर अजिबात टीका करू नये, त्यांनी मध्यमवर्गाला किती दिलासा मिळाला आहे ते पाहिले पाहिजे. आपल्या देशावर ६० वर्षे राज्य केल्यानंतरही, ते आयकर सवलत स्लॅब ५ लाख रुपयांपेक्षा जास्त वाढवू शकले नाहीत. आज केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केवळ मध्यमवर्गालाच नाही तर ननिम्न मध्यम वर्ग आणि उच्च मध्यमवर्गीयांनाही सूट दिली आहे.”
Union Budget 2025 Highlights, 1 February 2025: अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठीच्या घोषणांचा समावेश
“देशातील शेतकरी गंभीर संकटाचा सामना करत आहे. आपल्या श्रमाच्या योग्य मोबदल्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरून हमीभावाची मागणी करत आहेत, मात्र केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात साधा उल्लेखही नाही. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सातत्याने वाढत असताना आणि कर्जमाफीची जोरदार मागणी होत असतानाही, भाजप सरकारने कोणतीही ठोस घोषणा केली नाही. किसान क्रेडिट कार्डची मर्यादा तीन लाखांवरून पाच लाखांपर्यंत वाढवली असली, तरी त्याचा शेतकऱ्यांना फारसा फायदा होणार नाही. उलट, ग्रामीण भागातील गरीब आणि मजुरांना आधार देणाऱ्या मनरेगा योजनेसाठी तरतूदीत कपात करून सरकारने त्यांच्यावर आणखी संकट ओढवले आहे. एकूणच ‘आवळा’ देऊन ‘कोहळा’ काढण्याचा प्रकार या अर्थसंकल्पातून दिसून येतो!”, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर दिली आहे.
देशातील शेतकरी गंभीर संकटाचा सामना करत आहे. आपल्या श्रमाच्या योग्य मोबदल्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरून हमीभावाची मागणी करत आहेत, मात्र केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात साधा उल्लेखही नाही. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सातत्याने वाढत असताना आणि कर्जमाफीची जोरदार मागणी होत… pic.twitter.com/qAOSz7CET0
— Nana Patole (@NANA_PATOLE) February 1, 2025
Union Budget 2025 Live Updates in Marathi: निर्मला सीतारमण यांचं अर्थसंकल्पीय भाषण संपल्यानंतर लोकसभेत काय झालं पाहा!
अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सर्व सत्ताधारी खासदारांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या बाकाजवळ येऊन त्यांचं अभिवादन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही निर्मला सीतारमण यांचं अभिवादन केलं.
आम बजट पेश हो जाने के बाद लोक सभा में उपस्थित मंत्रियों और सांसदों ने बजट के लिए वित्त मंत्री का अभिवादन किया। प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी भी वित्त मंत्री की सीट तक चलकर आए और बजट के लिए उनका अभिवादन किया। #BudgetSession2025 #Budget2025 @narendramodi @nsitharaman @FinMinIndia pic.twitter.com/0DhHFNdrI6
— SansadTV (@sansad_tv) February 1, 2025
FM Nirmala Sitharaman Speech Live Updates: केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी काय?
केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी काय जाहीर झालंय, यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
– मुंबई मेट्रो : 1255.06 कोटी
– पुणे मेट्रो : 699.13 कोटी
– एमयुटीपी : 511.48 कोटी
– एमएमआरसाठी एकात्मिक आणि हरित प्रवासी सुविधा: 792.35 कोटी
– मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे : 4004.31 कोटी
– सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक क्लस्टर : 1094.58 कोटी
– महाराष्ट्र ग्रामीण जोडसुधार प्रकल्प: 683.51 कोटी
– महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क : 596.57 कोटी
– नागनदी सुधार प्रकल्प : 295.64 कोटी
– मुळा-मुठा नदी संवर्धन : 229.94 कोटी
– ऊर्जा कार्यक्षम उपसा सिंचन प्रकल्प : 186.44 कोटी
केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्र!
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 1, 2025
(टिप : ही केवळ प्राथमिक माहिती. विविध मंत्रालयांची तरतूद तसेच रेल्वेची आकडेवारी सविस्तरपणे येईल.)
– मुंबई मेट्रो : 1255.06 कोटी
– पुणे मेट्रो : 699.13 कोटी
– एमयुटीपी : 511.48 कोटी
– एमएमआरसाठी एकात्मिक आणि हरित प्रवासी सुविधा: 792.35 कोटी
-…
How will Union Budget 2025 affect taxpayers? “ही पहा, अशी केली आहे अर्थमंत्र्यांनी आज मध्यमवर्गाची फसवणूक”
तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांनी अर्थसंकल्पावर टीका करताना १२ लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याच्या अर्थमंत्र्यांच्या घोषणेवर भाष्य केलं आहे. “अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं की १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही. पण त्यात एक मेख आहे. जर तुमचं उत्पन्न १२ लाख ८० हजारांच्या वर असेल, तर त्यावर ठरलेल्या ५ टक्के, १० टक्के किंवा १५ टक्के अशा स्तरानुसार कर लागू होईल. पण सूट दिलेलं उत्पन्न हे अजूनही १२ लाख नसून ० ते ४ लाख इतकंच आहे. शिवाय १२ लाख ८० हजाराच्या वर एक रुपयाही तुम्ही कमावत असाल, तर त्या संपूर्ण रकमेवर तुम्हाला कर भरावा लागणार आहे”, अशी पोस्ट साकेत गोखले यांनी केली आहे.
Here’s how the Finance Minister tried to CHEAT the middle class today ?
— Saket Gokhale MP (@SaketGokhale) February 1, 2025
FM announced in Budget Speech that “no tax for income below 12 lacs”.
But there’s a catch.
If your income is ANYTHING above 12.80 lacs, ALL of it WILL be taxed as under:
0-4 lacs – NIL
4-8 lacs – 5%…
१२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आल्यामुळे करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण त्याचवेळी अर्थमंत्र्यांनी ४ लाख ते ८ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर ५ टक्के व ८ ते १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर १० टक्के कर जाहीर केला आहे. त्यामुळे याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. पण १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त याचा अर्थ १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर ७५ हजार रुपये स्टँडर्ड डिडक्शन लागू केलं जाणार आहे. त्यामुळे ४ लाख ते १२ लाख यामधल्या दोन्ही स्लॅब्ससाठी जाहीर केलेला ५ टक्के आणि १० टक्के कर हा या स्टँडर्ड डिडक्शनमधून नील होणार आहे. त्यामुळेच या स्लॅब्जसाठी ५, १० किंवा १५ टक्के कर जाहीर करूनही प्रत्यक्षात कोणताही कर भरावा लागणार नाही.
अर्थमंत्र्यांनी केली नव्या टॅक्स स्लॅब्जची घोषणा, ‘असे’ असतील नवे स्लॅब्ज!https://t.co/Za3fYGLn3s < येथे वाचा सविस्तर वृत्त#Marathinews #Nirmalasitaraman #Unionbudget #Income #tax pic.twitter.com/tVvKf8L6tT
— LoksattaLive (@LoksattaLive) February 1, 2025
Union Budget 2025 Live Updates: अर्थसंकल्पाचा अन्वयार्थ, विश्लेषणात्मक बातम्या व विशेष लेख वाचण्यासाठी सबस्क्राइब करा
अर्थसंकल्पाचे सर्व अपडेट्स तर मिळतीलच, पण त्यातील क्लिष्ट व गुंतागुंतीच्या बाबींचं सविस्तर विश्लेषण व विशेष लेख वाचण्यासाठी सबस्क्राइब करा लोकसत्ता प्रीमियम!
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केलेल्या नव्या कररचनेमागे दिल्ली निवडणुकांचं राजकीय गणित असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. “दिल्लीतील मतदारांना आकर्षित करण्यासाठी कररचनेत हे बदल केले आहेत. एकीकडे अर्थमंत्री म्हणतात की १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त.. पण स्लॅब जाहीर करताना त्यांनी त्यावर १० टक्के कर सांगितलाय. हे म्हणजे तुम्ही म्हणताय कर नाही, पण कर आहे! सविस्तर माहिती आल्यावरच हे स्पष्ट होईल”, अशी भूमिका द्रमुकचे खासदार दयानिधी मारन यांनी मांडली आहे.
VIDEO | On Union Budget 2025, DMK MP Dayanidhi Maran (@Dayanidhi_Maran) says: "It's a big letdown for the entire country, especially for the middle class. The FM claims to be giving tax exemption up to income of Rs 12 lakh. But, the very next line, she says that there is 10% tax… pic.twitter.com/DcK4RH86vc
— Press Trust of India (@PTI_News) February 1, 2025
#WATCH | #UnionBudget2025 | DMK MP Dayanidhi Maran says, "It's a very disappointing Budget. The Budget seems to be like that, it's planned in such a way to woo the voters for Delhi, especially the Delhi elections coming on 5th February. The FM has given a big exemption saying… pic.twitter.com/hQ88jbvR6r
— ANI (@ANI) February 1, 2025
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी करदात्यांसाठी नवीन करप्रणाली जाहीर केली असून त्यात करमुक्त उत्पन्न मर्यादा ७ लाखांवरून थेट १२ लाखांपर्यंत वाढवली आहे. त्यातून सरकारी तिजोरीवर तब्बल १ लाख कोटींचा भार पडणार आहे. मात्र, हे १ लाख कोटी सामान्य करदात्यांच्या खिशात जाणार असून त्यातून बाजारपेठेत अतिरिक्त मागणी तयार होईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
VIDEO | Union Budget 2025 | Kolkata: "That is huge because the government is forgoing Rs 1 lakh crore. That Rs 1 lakh crore will create a huge demand and that was the problem in our system and everyone will get some money out of that Rs 1 lakh crore… She has also rationalised… pic.twitter.com/bTvqY6ax8r
— Press Trust of India (@PTI_News) February 1, 2025
Union Budget 2025 Live Updates, 1 February 2025: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया
प्राप्तिकराची करपात्र उत्पन्न मर्यादा ७ लाखांवरून तेट १२ लाखांपर्यंत नेली आहे. त्यामुळे प्राप्तिकराच्या या रचनेचा मोठा फायदा मध्यमवर्गीयांना, नोकरदारांना, नवतरुणांना होणार आहे. यामुळे मध्यमवर्गीयांच्या खिशात रक्कम राहणार आहे. त्यातून बाजारपेठेतील मागणी वाढू शकेल. त्यातून सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योगांना फायदा होऊ शकेल. हा अतिशय बोल्ड असा निर्णय आहे. हा निर्णय भारताच्या आर्थिक विकासातला मैलाचा दगड ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस</p>
या बदलांमुळे थेट करांमधून येणाऱ्या उत्पन्नावर १ लाख कोटी तर अप्रत्यक्ष करांमधून येणाऱ्या उत्पन्नावर २६०० कोटींचा बोजा पडणार आहे.
PTI INFOGRAPHICS | Union Budget 2025: Highlights of Finance Minister Nirmala Sitharaman's budget speech in Lok Sabha (n/30)#BudgetSessionWithPTI #Budget2025WithPTI pic.twitter.com/yHxoQBwyV0
— Press Trust of India (@PTI_News) February 1, 2025
वेगळं भांडवली उत्पन्न नसणाऱ्या करदात्यांना १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असेल. नव्या पद्धतीनुसार कर भरणा करणाऱ्या करदात्याचं उत्पन्न १२ लाख रुपये असेल, तर त्याला नव्या बदलांमुळे ८० हजार रुपयांचा कर कमी भरावा लागेल. याचा अर्थ, त्याचा १०० टक्के कर माफ होईल. एखाद्या करदात्याचं उत्पन्न १८ लाख असेल, तर त्याला नव्या बदलांमुळे ७० हजारांचा कर कमी भरावा लागेल. याचा अर्थ त्याचा ३० टक्के कर कमी होईल. २५ लाख उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीचा १ लाख १० हजारांचा कर कमी होईल, अर्थात त्याला २५ टक्के कर कमी भरावा लागेल.
PTI INFOGRAPHICS | Union Budget 2025: Highlights of Finance Minister Nirmala Sitharaman's budget speech in Lok Sabha (n/28)#BudgetSessionWithPTI #Budget2025WithPTI pic.twitter.com/rPkG1D2vqt
— Press Trust of India (@PTI_News) February 1, 2025
नवी कररचना
० ते ४ लाख – शून्य
४ ते ८ लाख – ५ टक्के
८ ते १२ लाख – १० टक्के
१२ ते १६ लाख – १५ टक्के
१६ ते २० लाख – २० टक्के
२० ते २४ लाख – २५ टक्के
२४ लाखांवर – ३० टक्के
News Alert! Govt proposes nil tax on income up to Rs 12 lakh per annum under New Tax Regime: FM.#BudgetSessionWithPTI #Budget2025WithPTI pic.twitter.com/bCBysaTif7
— Press Trust of India (@PTI_News) February 1, 2025
ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस मर्यादा ५० हजारांवरून १ लाखांपर्यंत वाढवण्यात आली
VIDEO | Union Budget 2025: Union Finance Minister Nirmala Sitharaman (@nsitharaman) says, "Personal Income Tax reforms with special focus on middle-class. Democracy, demography and demand are the key support builders in a journey towards 'Viksit Bharat'. The middle -class… pic.twitter.com/A2Y5Te1FfX
— Press Trust of India (@PTI_News) February 1, 2025
नवीन इन्कम टॅक्स विधेयकात न्यायाच्या तत्वाची अंमलबजावणी केली जाईल. हे विधेयक करदात्यांना समजण्यासाठी अत्यंत सोपं असेल. पण सुधारणा हेच ध्येय नसून ते चांगलं प्रशासन साध्य करण्यासाठीचं साधन आहे – निर्मला सीतारमण
मोबाईल फोनच्या बॅटरी स्वस्त होणार
टीव्हीचे देशांतर्गत उत्पादित होणारे पार्ट्स स्वस्त होणार
How will Union Budget 2025 affect taxpayers?
कर्करोग व अशा इतर गंभीर आजारांवर उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या एकूण ३६ जीवनावश्यक औषधांना मूलभूत कस्टम ड्युटीमधून पूर्णपणे सूट. याशिवाय इतर ६ जीवनावश्यक औषधांना कस्टम ड्युटीतून सूट देऊन ते ६ टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात येईल.
Union Budget 2025 Live Updates, 1 February 2025: अर्थसंकल्पचा पार्ट बी – अप्रत्यक्ष कर
७ प्रकारचे शुल्क हटवण्याची घोषणा.. यानंतर फक्त ८ प्रकारचे शुल्क शिल्लक राहतील. यात शून्य शुल्काचाही समावेश असेल.
How will Union Budget 2025 affect taxpayers?
२०२५-२६ साठी अर्थसंकल्पाचे सुधारित अंदाज…
एकूण उत्पन्न – ३४.९६ लाख कोटी
कर उत्पन्न – २८.८७ लाख कोटी
वित्तीय तुटीचा अंदाज – जीडीपीच्यी ४.४ टक्के
India Budget 2025 Live Updates:
सुधारित अंदाज
३१.४७ लाख कोटींच्या महसुलाचा अंदाज असून त्यापैकी निव्वळ कर रक्कम २५.५७ लाख कोटी इतकी असेल. एकूण खर्चाचा अंदाज ४७.१६ लाख कोटी असून त्यापैकी भांडवली खर्च १०.१८ लाख कोटी असेल. वित्तीय तुटीचा सुधारित अंदाज जीडीपीच्या ४.८ टक्के इतका असेल.
India Budget 2025 Live Updates:
वित्तीय तूट अशा प्रकारे ठेवली जाईल की केंद्र सरकारवरचं कर्जाचं प्रमाण यातून कमी होत जाईल. पुढच्या सहा वर्षांतला यासंदर्भातला आराखडा आर्थिक पाहणी अहवालात मांडण्यात आला आहे – निर्मला सीतारमण
अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुढच्या आठवड्यात नवीन कररचना विधेयक मांडलं जाईल – निर्मला सीतारमण यांनी केलं जाहीर
India Budget 2025 Live Updates:
छोट्या व मध्यम उद्योगांसाठी व नवउद्योजकांसाठी नवीन क्रेडिट व्यवस्था राबवली जाईल – निर्मला सीतारमण
VIDEO | "A scheme will be launched for 5 lakh women SC/ST first-time entrepreneurs. This will provide term loans up to Rs 2 crore during the next five years. The scheme will incorporate lessons from the successful Standup India scheme," says Finance Minister Nirmala Sitharaman… pic.twitter.com/66ajC3flcW
— Press Trust of India (@PTI_News) February 1, 2025
महाकुंभमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीवर चर्चेची मागणी करत विरोधकांनी सभात्याग केला
केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण या यंदाचा अर्थसंकल्प संसदेत सादर करत आहेत. अर्थसंकल्पात विविध क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा करण्यात येत आहेत. मात्र, विरोधकांनी सभात्याग केला आहे. उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी होऊन २५ पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. महाकुंभमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीवर सभागृहात चर्चेची मागणी विरोधकांनी केली होती. मात्र, विरोधकांची ही मागणी मान्य न झाल्याने विरोधकांनी सभात्याग केला आहे.
#budgetsession | Opposition parties demanded a discussion on the #mahakumbh stampede. Walked out to mark their protest. https://t.co/1AAypBZ0D6
— ANI (@ANI) February 1, 2025
Budget 2025 FM Nirmala Sitharaman Live Updates:
पुढच्या पाच वर्षांच पीएम रीसर्च फेलोशिप स्कीमअंतर्गत टेक्नोलॉजिकल संशोधनासाठी १० हजार फेलोशिप दिल्या जातील. आयआयटी व आयआयएममधील विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल – निर्मला सीतारमण
Union Budget 2025 Live Updates, 1 February 2025:
सर्व सरकारी शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ब्रॉडबँडची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार – निर्मला सीतारमण
Live analysis of Budget 2025 announcements in Marathi:
२०२५ मध्ये आणखी ४० हजार नागरिकांचं गृहस्वप्न पूर्ण करणार – निर्मला सीतारमण
Union Budget 2025 Live Updates, 1 February 2025:
ग्रीनफील्ड एअरपोर्टसाठी बिहारमध्ये विशेष तरतूद. भविष्यातील प्रवाशांची वाढती संख्या पाहाता त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी याचा उपयोग होईल. पाटणा विमानतळाची क्षमता वाढवण्यासाठीची आधीची तरतूद व ब्राऊन फील्ड एअरपोर्टव्यतिरिक्त ही अतिरिक्त तरतूद असेल.
मिथिलांचलमध्ये वेस्टर्न कोसी केनॉल प्रोजेक्टची घोषणा. यामुळे बिहारच्या मिथिलांचलमध्ये ५० हजार हेक्टरमध्ये शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा होईल – निर्मला सीतारमण
सागरी जैवविविधता विकास योजनेसाठी अतिरिक्त २५ हजार कोटींची तरतूद – निर्मला सीतारमण
FM Nirmala Sitharaman Speech Live Updates:
न्यूक्लिअर एनर्जी मिशन फॉर रीसर्च अँड डेव्हलपमेंट – भारतीय बनावटीच्या छोट्या मॉड्युलर रिअॅक्टर्ससाठी असा प्रकारची सुविधा उभारली जाईल. त्यासाठी १० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे – निर्मला सीतारमण
Live analysis of Budget 2025 announcements in Marathi:
विकसित भारतासाठी न्यूक्लिअर एनर्जी मिशन – २०४७ पर्यंत न्यूक्लिअर एनर्जीच्या माध्यमातून १०० गिगावॅट उर्जा उत्पादनाचं लक्ष्य – निर्मला सीतारमण
अर्थव्यवस्थेच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी सरकारकडून वार्षिक दस्तऐवज सादर केले जातात. (PC : Nirmala Sitharaman FB, Freepik)