जगात अब्जाधीश उद्योगपतींची काही कमतरता नाही. अशा काही व्यक्तींकडे मोठ्या प्रमाणात संपत्ती, आलिशान गाड्या आणि मौल्यवान वस्तू असल्याच्या बातम्या तुम्ही अनेकदा वाचल्याच असतील. पण काही अब्जाधीश त्यांच्या पैशामुळे नव्हे, तर त्यांच्या औदार्यामुळे चर्चेत राहतात. आम्ही तुम्हाला अशाच एका महिलेबद्दल सांगणार आहोत, जी आपल्या संपत्तीमुळे नव्हे तर तिच्या दानशूरपणामुळे चर्चेत आहे.

रोहिणी नीलेकणी या भारतातील सर्वात प्रसिद्ध दानशूर महिला आहेत, ज्यांनी एका वर्षात १२० कोटी रुपये दान स्वरूपात दिले आहेत. एडेलगिव्ह हुरुन इंडिया फिलान्थ्रोपिक वुमन २०२२ च्या यादीत त्यांना पहिले स्थान मिळाले आहे. प्रसिद्ध लेखिका रोहिणी यांनी पर्यावरण आणि शिक्षण क्षेत्रात सर्वाधिक सेवाभावी कामे केली आहेत. ही समाजसेवी व्यक्ती इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन नीलेकणी यांच्या पत्नी आहेत.

international monetary fund praises india for maintaining fiscal discipline in election year
निवडणूक वर्षातही भारताकडून वित्तीय शिस्त कायम; आंतरराष्ट्रीय़ नाणेनिधीकडून कौतुक; आघाडीच्या देशांमध्ये स्थान कायम राहणार
india demand of land marathi news
कार्यालयीन जागांच्या मागणीत ४३ टक्के वाढ, पहिल्या तिमाहीत १.६२ कोटी चौरस फुटांचे व्यवहार; बंगळूरुचा सर्वाधिक वाटा
Francoise Bettencourt Meyers
Richest Woman In The World : ‘या’ प्रसिद्ध कंपनीची सीईओ ठरली जगातील सर्वांत श्रीमंत महिला, संपत्ती वाचून व्हाल थक्क!
india second highest gst collection at 1 78 lakh crore in march
मार्चमध्ये दुसरे सर्वाधिक १.७८ लाख कोटींचे जीएसटी संकलन; आर्थिक वर्षात एकूण संकलन उद्दिष्टापेक्षा सरस २०.१८ लाख कोटींवर

दानाच्या बाबतीत अव्वल महिला अब्जाधीश

एडेलगिव्ह हुरुन इंडिया फिलान्थ्रोपिक वुमन २०२२ संबंधित यादी गेल्या वर्षी प्रसिद्ध झाली होती. यामध्ये १९ नवीन श्रीमंतांची नावे जोडली गेली, ज्यांनी एकूण ८३२ कोटी रुपयांचं दान दिलं आहे. या यादीत ६ महिलांचाही समावेश आहे आणि ६३ वर्षीय रोहिणी नीलेकणी १२० कोटी रुपयांच्या दानासह देशातील सर्वात मोठ्या परोपकारी म्हणजेच दानशूर व्यक्ती ठरल्या आहेत.

व्यवसायाने पत्रकार, पण NGO चालवतात

भारतीय कादंबरीकार रोहिणी नीलेकणी या सेवाभावी संस्थेच्या प्रभारी आहेत. त्यांनी प्रथम बुक्स आणि एकस्टेप यांसारख्या एनजीओंची स्थापना केली. याशिवाय पाणी आणि स्वच्छतेच्या राष्ट्रीय प्रकल्पांना पाठिंबा देण्यासाठी अर्घ्यम फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. रोहिणी नीलेकणी यांनी पत्रकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांनी अनेक प्रकाशन संस्थांमध्ये काम केले. मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या रोहिणी नीलेकणी यांनी एल्फिन्स्टन कॉलेजमधून फ्रेंच साहित्यात पदवी घेतली. ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत नोंदवलेल्या कॉर्पोरेट शेअर होल्डिंगनुसार, रोहिणी नीलेकणी सार्वजनिकरीत्या १ टक्के इक्विटी शेअर्सच्या मालकीण आहेत. ट्रेंडलाइननुसार, त्यांची संपत्ती ४,८७८.० कोटी आहे. तसेच रोहिणी नीलेकणी परोपकारी संघटनेच्या मते, निलेकणी कुटुंबाची एकूण मालमत्ता सध्या १.७ अब्ज डॉलर आहे. खरं तर यापूर्वीही नंदन नीलेकणी यांनी १९८१ मध्ये इतर सहा सॉफ्टवेअर इंजिनीअर्ससह इन्फोसिसची स्थापना केली. वुमन्स वेबच्या वृत्तानुसार, रोहिणी नीलेकणी यांनी सांगितले की, नंदन नीलेकणी यांनी त्यावेळी त्यांच्या जवळ असलेले १०,००० रुपये या व्यवसायात गुंतवत हा व्यवसाय वाढवला.