शेअर बाजारात लहान गुंतवणूकदार हे अनेकदा मोठ्या गुंतवणूकदारांच्या हालचालींवर आणि त्यांनी खरेदी केलेल्या शेअर्सवर लक्ष ठेवून असतात. भारतात अनेक दिग्गज गुंतवणूकदार आहेत, ज्यांचे अनुकरण करून त्यांच्यासारख्याच शेअर्समध्ये गुंतवणूक करणे किरकोळ गुंतवणूकदारांना आवडते. या यादीत प्रसिद्ध गुंतवणूकदार विजय केडिया यांचाही समावेश आहे. त्यांच्या पोर्टफोलिओमधील शेअर्सनी अनेक वर्षांमध्ये मल्टिबॅगर परतावा दिला आहे. सध्या विजय केडियांच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमधील एका शेअरची खूप चर्चा आहे, ज्याने १ वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केलेत. मल्टिबॅगर परतावा देणारा हा शेअर अतुल ऑटोचा आहे. गेल्या १ वर्षात हा शेअर २०१ रुपयांच्या किमतीवरून ४०६ रुपयांच्या पातळीवर वाढला आहे.

१० दिवसांत ३० टक्क्यांपर्यंत वाढ

गेल्या १० दिवसात अतुल ऑटोचा शेअर ३० टक्क्यांपर्यंत वाढला आहे, जो बँक एफडी किंवा इतर कोणत्याही गुंतवणुकीपेक्षा खूप जास्त आहे. मार्च तिमाहीत विक्रीचे मजबूत आकडे सादर केल्यानंतर या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे.

विजय केडिया यांनी घाऊक भावाने शेअर्स केले खरेदी

विजय केडिया वैयक्तिकरित्या अतुल ऑटोमध्‍ये ८ टक्‍क्‍यांहून अधिक शेअर आणि कंपनीचे १६,८३,५०२ शेअर्स आहेत. तसेच त्यांनी त्यांच्या कंपनी केडिया सिक्युरिटीजद्वारे ३,२१,५१२ शेअर्ससह सुमारे १.३५ टक्के हिस्सा घेतला आहे. अतुल ऑटो ज्यांनी वर्षभरात १०१ टक्के परतावा दिला आहे, ही गुजरात स्थित स्मॉल कॅप कंपनी असून, तिचे बाजारमूल्य ९७३.५६ कोटी आहे.

हेही वाचाः भारतातील चौथी सर्वात श्रीमंत महिला; ३२,००० कोटींची कंपनी आणि ५० देशांमध्ये तिचा व्यवसाय, कोण आहे ती?

नफा आणि विक्री दोन्ही वाढली

अतुल ऑटोने सांगितले की, मार्च तिमाहीत कंपनीने ३१५४ युनिट्सची विक्री केली, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ११४.५६ टक्के अधिक आहे. अतुल ऑटोने गेल्या वर्षी याच तिमाहीत १४७० मोटारींची विक्री केली होती. तसेच कंपनीने २०२२-२३ या आर्थिक वर्षात एकूण २५,५४९ युनिट्सची विक्री केली होती. हा आकडा देखील मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत ६० टक्क्यांनी अधिक आहे. डिसेंबर तिमाहीत अतुल ऑटोचा निव्वळ नफा ३.८५ रुपये होता, तर गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीला ८.८१ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. तसेच या तिमाहीत कंपनीची विक्री १३३.११ कोटी रुपये होती, जी मागील तिमाहीच्या तुलनेत २९.४३ टक्क्यांनी अधिक होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचाः एलआयसीची वर्षभरातील सर्वात मोठी कामगिरी, दररोज अदाणी एंटरप्रायझेसचे ‘इतके’ शेअर्स केले खरेदी