मार्च महिना संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. यानंतर पुढील महिना एप्रिल सुरू होईल, ज्यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल लागू होणार आहेत. खरं तर आता एप्रिल महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादीही जाहीर करण्यात आली आहे. जर तुमचे बँकेशी संबंधित कोणतेही काम करायचे राहिले असेल तर लवकरात लवकर करून घ्या, कारण एप्रिलमध्ये बँका १५ दिवस बंद राहणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बँका किती दिवस बंद राहणार?

बँकिंग हॉलिडे कॅलेंडरनुसार, एप्रिलमध्ये 15 दिवस बँका बंद राहतील, त्यात प्रादेशिक आणि राष्ट्रीय सुट्ट्यांसह दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार आणि रविवारचाही समावेश आहे. एप्रिलमधील बँका म्हणजे महावीर जयंती, बाबू जगजीवन राम यांचा जन्मदिन, गुड फ्रायडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, संक्रांती/बिजू महोत्सव/बिसू उत्सव, तामिळ नववर्ष दिन, विशू/बोहाग बिहू, बंगाली नववर्ष दिन (नबबरशा), शब-एल- कद्र ईद-उल-फित (रमजान ईद)/गरिया पूजा/जुमात-उल-विदा आणि रमजान ईद (ईद-उल-फितर) या दिवशी बंद राहतील.

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bank holidays in april 2023 get the work done soon banks will remain closed for 15 days in april vrd
First published on: 25-03-2023 at 15:35 IST