scorecardresearch

भरत देसाईंची TCSमधून कामाला सुरुवात, नंतर १.६५ लाखांत अपार्टमेंटमधून व्यवसायात उतरले, आता २८००० कोटींची कंपनी

भरत देसाई यांनी २०१८ मध्ये फ्रेंच आयटी फर्म Atos SE ला २८,००० कोटी रुपयांना फक्त १.६५ लाख रुपयांपासून सुरू झालेली सिंटेल विकली. भरत देसाई आणि त्यांच्या पत्नीची कंपनीत ५७ टक्के भागीदारी होती.

Bharat Desai
Bharat Desai

जर एखाद्या व्यक्तीचे ध्येय दृढ असेल आणि त्याने आपले ध्येय साध्य करण्यासाठी योग्य मार्गावरून चालल्यास निश्चितच त्याला त्याचे गंतव्यस्थान प्राप्त होते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे भारतीय वंशाचे अमेरिकन अब्जाधीश भरत देसाई आहेत. आयआयटी बॉम्बेमध्ये शिकत असताना देसाई यांनी नोकरीऐवजी स्वत:ची कंपनी स्थापन करण्याचा विचार केला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) मध्ये काम करण्यासाठी १९७६ मध्ये अमेरिकेला गेले. त्यावेळी त्यांना नोकरी नक्कीच मिळाली, पण तरीही त्यांनी स्वतःचा व्यवसाय करण्याचे स्वप्न सोडून दिले नाही. १९८० मध्ये त्यांनी पत्नी नीरजा सेठीसोबत मिळून त्यांच्या छोट्याशा अपार्टमेंटमधून सिंटेल या आयटी कंपनीचा पाया रचला.

त्यांनी २०१८ मध्ये फ्रेंच आयटी फर्म Atos SE ला २८,००० कोटी रुपयांना फक्त १.६५ लाख रुपयांपासून सुरू झालेली सिंटेल ही कंपनी विकली. भरत देसाई आणि त्यांच्या पत्नीची कंपनीत ५७ टक्के भागीदारी होती. २०२२ मध्ये फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत भरत देसाई १९२९ व्या क्रमांकावर होते. फोर्ब्सनुसार, देसाई यांची रिअल टाइम नेट वर्थ १२,३८१ कोटी रुपये आहे. सध्याच्या घडामोडीबद्दल बोलायचे झाल्यास एकूण संपत्तीच्या बाबतीत ते १८७४ व्या स्थानावर आहे. भरत देसाई यांनी सिंटेलची विक्री केली, तेव्हा त्या वर्षी कंपनीचा महसूल ९०० दशलक्ष डॉलर होता.

भरत देसाईंचा केनियामध्ये जन्म

भरत देसाई यांचा जन्म केनियात झाला. ते गुजराती कुटुंबातील आहे. त्यांनी आयआयटी बॉम्बे येथून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले. १९७६ मध्ये त्यांना टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये प्रोग्रामर म्हणून नोकरी मिळाली आणि ते अमेरिकेत गेले. अमेरिकेत त्यांची भेट नीरजा सेठीशी झाली. दोघांच्या भेटीचे कालांतराने प्रेमात रूपांतर झाले आणि दोघांनी लगेचच लग्न केले. नीरजा आणि भरत यांना दोन मुले आहेत. भरत यांनी यूएसएमधील स्टीफन एम. रॉस स्कूल ऑफ बिझनेस येथून फायनान्समध्ये एमबीए केले.

सिंटेलचा पाया १९८० मध्ये घातला गेला

TCS मध्ये काम करत असताना भरत देसाई आणि नीरजा सेठी यांनी IT कंपनी Syntel चा पाया रचला. केवळ १.६५ लाख रुपये गुंतवून त्यांनी आपल्या छोट्या अपार्टमेंटमधून याची सुरुवात केली. सुरुवातीला ही कंपनी फारशी यशस्वी झाली नाही. पहिल्या वर्षी त्यांच्या फर्मने फक्त ३०,००० डॉलरचा महसूल मिळवला. २०१८पर्यंत त्याच्या कंपनीचा महसूल ९०० दशलक्ष डॉलरपर्यंत वाढला.

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-03-2023 at 11:50 IST

संबंधित बातम्या