scorecardresearch

बिसलेरीने घेतला मोठा निर्णय, आता ही महिला होणार कंपनीची नवीन बॉस

बिसलेरीचे चेअरमन रमेश चौहान म्हणाले, “जयंती आमच्या व्यावसायिक टीमसोबत कंपनी चालवेल आणि आम्हाला व्यवसायात सहकार्य करेल, तसेच आम्हाला व्यवसाय विकायचा नाही.

Jayanthi Chauhan
Jayanthi Chauhan

जेव्हा कोणी बाहेरून पाण्याची बाटली विकत घेतो, तेव्हा एक ब्रँड सर्वांच्या क्षणार्धात डोळ्यासमोर येतो आणि तो म्हणजे बिसलेरी. बिसलेरी पाण्याची बाटली भारतात मोठ्या प्रमाणात विकत घेतली जाते. पण आता बिसलेरी कंपनीसंदर्भातच एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (TCPL) ने बिसलेरीच्या अधिग्रहण प्रक्रियेतून माघार घेतल्यामुळे आता बिसलेरी इंटरनॅशनलचे अध्यक्ष रमेश चौहान यांची मुलगी जयंती चौहान बिसलेरी पाण्याच्या कंपनीची प्रमुख होणार आहे, असा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बिसलेरीचे चेअरमन रमेश चौहान म्हणाले, “जयंती आमच्या व्यावसायिक टीमसोबत कंपनी चालवेल आणि आम्हाला व्यवसायात सहकार्य करेल, तसेच आम्हाला व्यवसाय विकायचा नाही.” 42 वर्षीय जयंती चौहान सध्या तिच्या वडिलांनी स्थापन केलेल्या कंपनीच्या उपाध्यक्षा आहेत. जयंती चौहान यांनी तिचे बालपण दिल्ली, मुंबई आणि न्यूयॉर्क शहरात घालवले.

बिसलेरी पाण्याची बाटली सगळीकडेच उपलब्ध

दुसरीकडे शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर जयंती चौहान लॉस एंजेलिसमधील फॅशन इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अँड मर्चेंडायझिंग (FIDM) मध्ये प्रॉडक्ट डेव्हलपमेंटचा अभ्यास करण्यासाठी गेली, त्यानंतर तिने इस्टिटूटो मारंगोनी मिलानोमधून फॅशन स्टायलिंगमध्ये नशीब आजमावलं. तिने लंडन कॉलेज ऑफ फॅशनमधून फॅशन स्टायलिंग आणि फोटोग्राफीमध्ये पदवी देखील मिळवली. जयंती ही अँजेलो जॉर्जच्या नेतृत्वाखालील व्यावसायिक व्यवस्थापन टीमसोबत काम करणार आहे. ८२ वर्षीय रमेश चौहान यांनी या वर्षाच्या सुरुवातीला हा ब्रँड टाटा समूहाला अंदाजे ७,००० कोटी रुपयांना विकला होता. भारतातील सर्वात मोठ्या पिण्याच्या पाण्याच्या ब्रँडसोबतचा हा करार टाटा समूहाच्या अनिश्चिततेमुळे रद्द करण्यात आला.

खरं तर मूल्यांकनाबाबत कोणतेही मतभेद नसल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे विश्लेषकांच्या मते, प्रवर्तक भविष्यात त्यांचे मत बदलू शकतात. टाटा कंझ्युमरने दोन वर्षांपूर्वी चौहान कुटुंबाशी बिसलेरीचे अधिग्रहण करण्यासाठी चर्चा सुरू केली होती, परंतु गेल्या आठवड्यात ही चर्चा अंतिम टप्प्यात आली होती. परंतु अचानक ती चर्चा फिस्कटली. त्यामुळे आता बिसलेरीनं जयंती चौहान यांना कंपनीच्या प्रमुख करण्याची घोषणा केली आहे. जयंती गेल्या अनेक वर्षांपासून व्यवसायात सक्रिय आहेत. बिसलेरीच्या पोर्टफोलिओचा भाग असलेला वेदिका ब्रँड अलीकडच्या काही वर्षांत टाटा समूहाच्या केंद्रस्थानी होता. त्यासाठीच बिसलेरीचं अधिग्रहण करण्याची टाटा समूहाची मनीषा होती. “कंपनीने बिसलेरी इंटरनॅशनलसोबत कोणताही निश्चित करार किंवा बंधनकारक वचनबद्धता केली नसल्याचा खुलासाही टाटा समूहाची फास्ट-मूव्हिंग कंझ्युमर गुड्स (FMCG) शाखा 17 मार्चला एका एक्सचेंज फायलिंगमध्ये केला होता. त्यानंतर आता जयंती चौहान बिसलेरी पाण्याच्या कंपनीच्या प्रमुख होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-03-2023 at 15:26 IST

संबंधित बातम्या