Over 9,000 Employees To Be Laid Off By Microsoft: मायक्रोसॉफ्टमध्ये कर्मचारी कपातीची आणखी एक फेरी सुरू झाली आहे. यावेळी ९,००० कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागणार आहेत. या वर्षी कंपनीतील ही दुसरी मोठी कर्मचारी कपात आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, कंपनीच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, या नोकरकपातीचा परिणाम मायक्रोसॉफ्टच्या सुमारे ४ टक्के कर्मचाऱ्यांवर होणार आहे. दरम्यान, या नोकरकपातीमध्ये ‘कँडी क्रश’ ही जगप्रसिद्ध गेम बनवणाऱ्या कंपनीतील २०० कर्मचाऱ्यांनाही नोकरी गमवावी लागणार आहे. ही कंपनी आता मायक्रोसॉफ्टच्या मालकीची आहे.

यापूर्वी ब्लूमबर्गच्या अहवालातच म्हटले होते की, जुलैमध्ये मायक्रोसॉफ्टमध्ये आणखी एक कर्मचारी कपात होऊ शकते. या हालचालीमुळे कंपनीच्या एक्सबॉक्स विभागासह इतर विभागातील हजारो नोकऱ्या जाऊ शकतात. मायक्रोसॉफ्टच्या एक्सबॉक्स विभागातील १८ महिन्यांतील ही चौथी मोठी कपात असेल.

प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, हे पाऊल प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि व्यवस्थापनाचे स्तर कमी करण्यासाठी उचलण्यात आले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये (एआय) वाढत्या गुंतवणुकीदरम्यान कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन करत आहे.

मायक्रोसॉफ्टने या वर्षी मे महिन्यात सुमारे ६,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते, जी गेल्या काही वर्षांतील मायक्रोसॉफ्टची सर्वात मोठी कर्मचारी कपात होती. त्यानंतर जूनच्या सुरुवातीला कंपनीने ३०० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्याची बातमी आली होती.

मायक्रोसॉफ्टचा गेमिंग विभाग असलेल्या एक्सबॉक्सचे प्रमुख फिल स्पेन्सर यांनी कर्मचाऱ्यांना एका अंतर्गत मेमोमध्ये या नोकरकपातीबाबत माहिती दिली आहे. ज्यात म्हटले आहे की, “कंपनी सर्वाधिक क्षमता असलेल्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कठीण निर्णय घेत आहे.”

ही नोकरकपात केवळ एक्सबॉक्सपुरती मर्यादित नाही. ‘कँडी क्रश’ ही मोबाइल गेम तयार करणाऱ्या किंग कंपनीतील सुमारे १०% कर्मचाऱ्यांना, म्हणजेच जवळपास २०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढले जात आहे. ही कंपनी आता मायक्रोसॉफ्टच्या मालकीची आहे.

एआयमध्ये मोठी प्रगती होत असताना मायक्रोसॉफ्टदेखील त्यात गुंतवणूक वाढवत आहे. विविध उद्योगांमधील अनेक कंपन्या त्यांच्या उत्पादनांमध्ये आणि सेवांमध्ये एआयचे एकत्रीकरण करत आहेत. कंपन्या आता एआयशी संबंधित नोकऱ्यांना महत्त्व देत आहेत आणि खर्च कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मायक्रोसॉफ्ट १ जुलै ते ३० जून या कालावधीत आर्थिक वर्षाचे पालन करते. जून २०२४ च्या आकडेवारीनुसार, कंपनीकडे २.२८ लाख पूर्णवेळ कर्मचारी होते. यापैकी ५५ टक्के कर्मचारी अमेरिकेत काम करत होते.