सामान्यांचं बजेट कोलमडणार, पुन्हा सीएनजी महागणार

मीडिया रिपोर्टनुसार, पेट्रोलियम आणि नॅच्युरल गॅस मॅनेजमेंट बोर्डानं सांगितलं की, गेल इंडियाच्या नॅच्युरल गॅस पाइपलाइनचे दर ५८.६१ रुपये प्रति एमएमबीटीयू (मेट्रिक दशलक्ष ब्रिटीश औष्णिक युनिट) होणार आहे. हे दर ४५ टक्क्यांनी जास्त आहेत.

CNG pumps
CNG pumps

सामान्य माणसाला पुन्हा एकदा महागाईचा झटका बसणार आहे. सीएनजीचे दर पुन्हा एकदा भडकणार असून, सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. नैसर्गिक वायू आणि सीएनजीचे दर वाढल्यास फक्त गाडी चालवणं आणि जेवण बनवणं महागणार नाही, तर नैसर्गिक वायूचा वापर हा वीजनिर्मिती आणि खतांचे उत्पादनातही होतो. म्हणजेच घरातील विजेपासून ते शेतीवरही याचा प्रभाव पडणार आहे. गेल इंडिया पाइपलाइन गॅसचे दर वाढवण्याच्या विचारात आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, पेट्रोलियम आणि नॅच्युरल गॅस मॅनेजमेंट बोर्डानं सांगितलं की, गेल इंडियाच्या नॅच्युरल गॅस पाइपलाइनचे दर ५८.६१ रुपये प्रति एमएमबीटीयू (मेट्रिक दशलक्ष ब्रिटीश औष्णिक युनिट) होणार आहे. हे दर ४५ टक्क्यांनी जास्त आहेत. त्यामुळे सीएनजीच्या सध्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता असून, नवे दर १ एप्रिल २०२३ पासून लागू होऊ शकतात.

१ रुपयापर्यंत वाढू शकतो दर

मिळालेल्या माहितीनुसार, दरात झालेल्या वाढीचा फायदा आणि नुकसान दोन्ही होऊ शकते. महानगर गॅस लिमिटेड (MLG)चे व्यवस्थापकीय संचालक आशू सिंघल यांच्या मते, टॅरिफमध्ये वाढ केल्यानं काही लोकांना फायदा होऊ शकतो. तर काही लोकांना नुकसान होण्याचीही शक्यता आहे. नवी दिल्लीत प्रति किलो ८२.१२ रुपये असलेला सीएनजी एक रुपयानं महागण्याची शक्यता आहे.

रिक्षाचं भाडं वाढण्याची शक्यता

सीएनजी दर वाढल्यास आता ऑटो आणि टॅक्सीचे भाडे वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणाऱ्या सामान्यांच्या खिशावर त्याचा परिणाम होणार आहे. सरकारने वर्ष २०३० पर्यंत नॅच्युरल गॅसचं उत्पादन वाढवण्याबरोबरच त्याचा योगदानाला ६.२ टक्क्यांवरून १५ टक्क्यांपर्यंत करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे.

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-03-2023 at 13:29 IST
Next Story
हिंडेनबर्गच्या अहवालात ‘या’ भारतीय महिलेचे नाव; काय आहे ३ लाख कोटींचे कनेक्शन?
Exit mobile version