मुंबई : सरलेल्या ऑक्टोबरमध्ये इक्विटी अर्थात समभागसंलग्न म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकीचा ओघ घसरून ९,३९० रुपयांवर सीमित राहिला. सप्टेंबरमध्ये या फंडातील प्रवाह १४,०७७ कोटी रुपयांवर होता. मात्र गुंतवणुकीचा सर्वतोमुखी पर्याय बनलेल्या नियोजनबद्ध गुंतवणूक अर्थात ‘एसआयपी’च्या माध्यमातून ऑक्टोबरमधील योगदान १३,००० कोटींच्या विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया अर्थात ‘अ‍ॅम्फी’द्वारे जाहीर मासिक आकडेवारीनुसार, सप्टेंबर महिन्यात १२,९७६ कोटी रुपये असलेल्या ‘एसआयपी’ गुंतवणुकीने ऑक्टोबरमध्ये अभूतपूर्व १३,०४० कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चालू वर्षात मे महिन्यापासून ‘एसआयपी’च्या माध्यमातून होणारी गुंतवणूक १२,००० कोटी रुपयांच्या पुढे कायम आहे. मे महिन्यात १२,२८६ कोटी रुपये, जूनमध्ये १२,२७६ कोटी रुपये तर जुलै महिन्यामध्ये १२,१४० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. तर चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यांत म्हणजेच एप्रिल २०२२ मध्ये ११,८६३ कोटी रुपयांचा ओघ आला होता.

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Decline in investment in equity funds in october asj
First published on: 16-11-2022 at 13:15 IST