भारतीय वंशाचे वसंत नरसिंहन हे अमेरिकेतील नोव्हार्टिस या मोठ्या फार्मा कंपनीचे सीईओ आहेत. नरसिंहन हे जागतिक स्तरावर १ कोटींहून सर्वाधिक पगार घेणारे भारतीय वंशाचे सीईओ आहेत. नरसिंहन यांनी २०१८ मध्ये स्विस MNC नोव्हार्टिसची सूत्रे हाती घेतली आणि तेव्हापासून ते १८५ अब्ज डॉलर (१५,२९,००० कोटी रुपये) बाजारमूल्य असलेल्या कंपनीचे नेतृत्व करीत आहेत. नरसिंहन यांनी प्रशिक्षित डॉक्टर म्हणून सुरुवात केली होती. भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक नरसिंहन हे सर्व जागतिक फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये सर्वात तरुण सीईओ आहेत. पेशाने डॉक्टर असलेले सीईओ बनलेल्या नरसिंहन यांनी जगातील काही मोठ्या कंपन्यांसाठी काम केले आहे. वसंत नरसिंहन हार्वर्ड मेडिकल स्कूलमधून डॉक्टर झाले. नरसिंहन यांच्या प्रगतीची तुलना गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांच्याशी केली जाते. कोण आहेत वसंत नरसिंहन? वसंत नरसिंहन यांचा जन्म आणि बालपण युनायटेड स्टेट्समध्ये झाले असले तरी त्यांचे पालक मूळचे तामिळनाडूचे होते. नरसिंहन यांनी त्यांच्या महाविद्यालयीन काळात भारतातील गरिबीवरही काम केले. करिअर म्हणून त्यांनी आरोग्यसेवा स्वीकारली. त्यांनी शिकागो विद्यापीठातून जीवशास्त्रात पदवी संपादन केली. तसेच प्रतिष्ठित हार्वर्ड मेडिकल स्कूलमधून एमडी झाले आणि जॉन एफ. केनेडी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटमधून सार्वजनिक धोरणात (Public Policy) पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. १९७० मध्ये त्यांचे वडील तामिळनाडूहून अमेरिकेत गेले होते. नरसिंहन यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात मॅकेन्झी अँड कंपनीतून केली. ते २००५ मध्ये नोव्हार्टिसमध्ये सामील झाला आणि एका दशकाहून अधिक काळ फार्मा दिग्गजसोबत विविध नेतृत्वाची भूमिका निभावली. यादरम्यान त्यांनी सँडोज इंटरनॅशनलमध्येही काम केले. नोव्हार्टिसच्या वार्षिक अहवाल २०२२ नुसार, नरसिंहन यांची एकूण जारी केलेली भरपाई ७५.५ कोटी रुपयांपेक्षा जास्त होती.