२०२३ वर्षात जुलै महिन्याचा खाण आणि उत्खनन क्षेत्राच्या खनिज उत्पादनाचा निर्देशांक १११.९ वर पोहोचला असून, जुलै २०२२ च्या तुलनेत हे प्रमाण १०.७ टक्के जास्त आहे. भारतीय खाण ब्युरोच्या (आयबीएम) तात्पुरत्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते जुलै या कालावधीतील वाढ मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत ७.३ टक्के इतकी आहे. जुलै २०२३ मध्ये महत्त्वाच्या खनिजांच्या उत्पादनाच्या स्तरात वाढ झाली आहे. कोळसा ६९३ लाख टन, लिग्नाइट ३२ लाख टन, नैसर्गिक वायू (उपयुक्त ) ३०६२ दशलक्ष घन मीटर, पेट्रोलियम (कच्चे ) २५ लाख टन, बॉक्साइट १४७७ हजार टन, क्रोमाईट २८० हजार टन, तांबे घन १० हजार टन, सोने १०२ किलो, लोह धातू १७२ लाख टन, शिसे घन ३० हजार टन, मॅगनीज धातू २१७ हजार टन, जस्त घन १३२ हजार टन, चुनखडी ३४६ लाख टन, फॉस्फराईट १२० हजार टन आणि मॅग्नेसाइट १० हजार टन वाढ झाली आहे. हेही वाचाः देशात २०७० सालापर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे ध्येय गाठण्यासाठी बांधकाम क्षेत्रात हरित उपक्रम राबवले जाणार – नितीन गडकरी जुलै २०२२ च्या तुलनेत जुलै २०२३ दरम्यान अनेक खनिजांमध्ये सकारात्मक वाढ झाली आहे. क्रोमाईट (४५.९%), मॅगनीज धातू (४१.७%), कोळसा (१४.९%), चुनखडी (१२.७%), लोह धातू (११.२%), सोने (९.७%), तांबे घन (९%), नैसर्गिक वायू (उपयुक्त ८.९%), शिसे घन (४.७%), जस्त घन (३.६%), मॅग्नेसाइट (३.४%) आणि पेट्रोलियम (कच्चे ) (२.१%) अशी वाढ झाली आहे. हेही वाचाः एशियन पेंट्सचे सह संस्थापक अश्विन दाणी यांचे निधन, कंपनीला सर्वात मोठी पेंट फर्म बनवण्यात मोलाचे योगदान नकारात्मक वाढ दर्शविणाऱ्या इतर महत्त्वाच्या खनिजांमध्ये काही खनिजांचा समाविष्ट आहेत. लिग्नाइट (-०.७%), बॉक्साइट (-३.२%), फॉस्फराइट (-२४.७%) आणि हिरे (-२७.३%) या खनिजांमध्ये नकारात्मक वाढ झाली आहे.