मुंबई : केंद्र सरकारच्या सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेत ११ डिसेंबर २०१७ मध्ये गुंतविलेल्या रोख्यांचे मुदतपूर्व विमोचन (रिडम्प्शन) करायचे झाल्यास, रिझव्र्ह बँकेने १२,८०१ रुपये प्रतिग्रॅम असा दर निश्चित केल्याचे जाहीर केले. रोख्यांच्या खरेदी किमतीच्या तुलनेत हा दर ३४१ टक्के अधिक आहे.
गुंतवणूकदारांना ११ डिसेंबर २०१७ मध्ये प्रतिग्रॅम २,९५४ रुपये दराने सुवर्ण रोख्यांचे वाटप करण्यात आले होते. तर ऑफलाइन खरेदी करणाऱ्यांनी प्रति ग्रॅम २,९०४ रुपये किंमत त्यावेळी निश्चित करण्यात आली होती. परिणामी आता निश्चित करण्यात आलेली १२,८०१ किमतीच्या तुलनेत गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम ९,८९७ रुपयांचा लाभ झाला आहे, शिवाय यात रोख्यांच्या माध्यमातून २.५ टक्के मिळणारे वार्षिक व्याज समाविष्ट केलेली नाही.
भारतीयांमधील धातूरूपी सोन्याचे आकर्षण पाहता त्याला पर्याय या रूपाने आणि सोन्याच्या आयातीवर खर्च होणाऱ्या विदेशी चलनात कपात केली जाऊ शकेल, या उद्देशाने १४ जानेवारी २०१६ रोजी सार्वभौम सुवर्ण रोखे योजना सुरू केली गेली. १७ नोव्हेंबर २०१६ मध्ये सर्वप्रथम विक्री करण्यात आलेल्या सुवर्ण रोख्यांची विक्री २,९५७ रुपये प्रतिग्रॅम अशी होती. या रोख्यांचा मुदत कालावधी हा आठ वर्षांचा असून, पाच वर्षांनंतर यातील गुंतवणूक मुदतपूर्व काढण्याची मुभा दिली गेली आहे. नवीन रोख्यांची विक्री रिझर्व्ह बँकेकडून थांबवण्यात आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 12th Dec 2025 रोजी प्रकाशित
केंद्र सरकारच्या गोल्ड बॉण्डमधून ३४१ टक्के रिटर्न
सोन्याच्या आयातीवर खर्च होणाऱ्या विदेशी चलनात कपात केली जाऊ शकेल, या उद्देशाने १४ जानेवारी २०१६ रोजी सार्वभौम सुवर्ण रोखे योजना सुरू केली गेली.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 12-12-2025 at 16:51 IST | © The Indian Express (P) Ltd
मराठीतील सर्व वित्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 341 percent return to investors from sovereign gold bonds print eco news zws
