scorecardresearch

‘ॲम्वे’कडून बहुस्तर साखळी योजनेतून ४,००० कोटींची लुबाडणूक! ‘ईडी’कडून आरोपपत्र दाखल

गेल्या वर्षी एप्रिलमध्ये या प्रकरणी ईडीने ७५७ कोटी रुपयांहून अधिक संपत्ती जप्तही केली आहे.

4,000 crore loot Amway multi-level chain scheme, ED filed Charge sheet
‘ॲम्वे’कडून बहुस्तर साखळी योजनेतून ४,००० कोटींची लुबाडणूक! (Photo Courtesy- loksatta graphics team, wikipedia)

पीटीआय, नवी दिल्ली

थेट विक्री क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपनी ‘ॲम्वे इंडिया’ने मल्टी लेव्हल मार्केटिंग (एमएलएम) म्हणजे बहुस्तर साखळी धाटणीच्या व्यवसायाद्वारे ४,००० कोटी रुपयांहून अधिक मोठ्या रकमेची लुबाडणूक केली गेली आणि त्यातील ७० टक्के रक्कम परदेशी बँक खात्यांमध्ये हस्तांतरित केली गेली, असे आरोप सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी दाखल केलेल्या आरोपपत्रात आहेत.

GST
सप्टेंबरमध्ये जीएसटी संकलन १० टक्क्यांनी वाढले, चालू आर्थिक वर्षात चौथ्यांदा १.६२ लाख कोटी रुपये केले पार
Maruti Suzuki
मारुती सुझुकीला जीएसटी प्राधिकरणाकडून १३९.३ कोटी रुपयांची नोटीस; नेमकं प्रकरण काय?
dhule scam, doubling the money scam in dhule, dhule lure of doubling the money, forex currency market company
फाॅरेक्स करन्सी मार्केट कंपनीत पैसे दुप्पट करण्याचे आमिष; धुळ्यात दाम्पत्यासह सात जणांविरुध्द गुन्हा
five tonnes chemically mixed chaff seized Bhusawal Two people arrested
भुसावळमध्ये पाच टनांपेक्षा अधिक रसायनमिश्रित खवा जप्त; दोघांना अटक

लाभांश, स्वामित्व हक्क (रॉयल्टी) आणि इतर खर्चाच्या पूर्ततेच्या नावाखाली सदस्यांकडून गोळा केलेले २,८५९ कोटींहून अधिक रुपये परदेशी गुंतवणूकदारांच्या बँक खात्यात वळते केले गेले, असे तपास यंत्रणेने ॲम्वेविरुद्ध आरोपपत्र दाखल केल्यानंतर प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. फिर्यादीची आर्थिक गैरव्यवहारासंबंधीची तक्रार हैदराबादमधील विशेष पीएमएलए न्यायालयात दाखल करण्यात आली होती, ज्याची सोमवारी त्याची दखल घेतली, असे ईडीने सांगितले. कंपनी वस्तूंच्या विक्रीच्या नावाखाली बेकायदेशीर ‘मनी सर्क्युलेशन स्कीम’ चालवत होती आणि भरमसाट लाभ आणि प्रोत्साहन भत्त्याचे आमिष दाखवून विक्रेता सदस्यांची नोंदणी करून, कंपनीकडून प्रत्यक्षात सर्वसामान्य जनतेची फसवणूक सुरू होती, असा न्यायालयात दाखल तक्रारीचा दावा आहे.

पाव शतकांपूर्वी भारतात कार्यारंभ झालेल्या कंपनीने यावर प्रतिक्रिया देताना, कंपनी सर्व कायद्यांचे पालन करत असल्याचा दावा केला. ईडीने दाखल केलेले आरोपपत्र आणि फिर्यादीची तक्रार २०११ सालातील तपासाशी संबंधित आहे आणि तेव्हापासून तपास यंत्रणांना सहकार्य आणि वेळोवेळी मागितलेली सर्व माहिती कंपनीने दिली आहे, असे ॲम्वेच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये या प्रकरणी ईडीने ७५७ कोटी रुपयांहून अधिक संपत्ती जप्तही केली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 4000 crore loot from amway through multi level chain scheme ed filed charge sheet print eco news dvr

First published on: 21-11-2023 at 10:15 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×