scorecardresearch

Premium

बायजू पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याच्या तयारीत, ४००० ते ५००० जणांना बसणार फटका

मोहन यांना नुकतेच कंपनीचे सीईओ बनवण्यात आले आहे. ते बराच काळ बायजूबरोबर आहेत. मोहन यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली आहे.

Byju’s Layoff
(file photo/indian express)

बायजूचे सीईओ अर्जुन मोहन यांनी कंपनीची पुनर्बांधणी सुरू केली आहे. याअंतर्गत ४ ते ५ हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. रिपोर्टनुसार, ही नोकर कपात Think and Learn Private Limited मध्ये होणार आहे, जी Byju ची ऑपरेटर आहे. विशेष म्हणजे यात आकाश इन्स्टिट्यूटचा समावेश होणार नाही. जी कंपनी बायजूने सुमारे १ अब्ज डॉलर्स देऊन खरेदी केली होती.

मोहन यांना नुकतेच कंपनीचे सीईओ बनवण्यात आले आहे. ते बराच काळ बायजूबरोबर आहेत. मोहन यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली आहे. टाळेबंदीचा परिणाम अनेक विभागांमध्ये दिसून येत असून, यामध्ये विक्री, विपणन आणि इतर अनेक विभागांचा समावेश असू शकतो. चार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यापूर्वी बायजूमधून राजीनामा दिला होता. एडटेकच्या मुख्य व्यवसाय अधिकारी प्रथ्युषा अग्रवाल, ट्यूशन सेंटर्सचे बिझनेस हेड हिमांशू बजाज आणि बिझनेस हेड मुकुट दीपक आणि एडटेकच्या आंतरराष्ट्रीय व्यवसायाचे वरिष्ठ उपाध्यक्ष चेरियन थॉमस यांनी राजीनामा दिला होता.

police registered case against four for threatening milk officer
दुधात भेसळ करणाऱ्यांची धुळ्यात अधिकाऱ्यांना दमदाटी
NIMA, nashik industries and manufacturers association, workers without helmet, punishment to factory owners
नाशिक : विनाहेल्मेट कामगारप्रश्नी कंपनी मालकांना दोषी धरणे अयोग्य, निमाचे प्रादेशिक परिवहनला साकडे
fficials now fined for delay in licence
‘आरटीओ’ला दणका! लायसन्स, आरसीला विलंब झाल्यास आता अधिकाऱ्यांना दंड
children void, voidable marriages rights to claim parents properties
बेकायदेशीर लग्नांमधून जन्मलेल्या अपत्यांना पालकांच्या मालमत्तेत हक्क!

हेही वाचाः Money Mantra : UIDAI चार प्रकारचे आधार कार्ड करते जारी, त्यांच्यातील फरक जाणून घ्या

बायजूवर संकटाचे ढग

बायजूमधील ही पहिलीच नोकर कपात नाही. या वर्षाच्या सुरुवातीलाही बायजूने हजारो लोकांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. बायजू सध्या आर्थिक संकटाशी झुंजत आहे. कंपनी तिच्या अनेक उपकंपन्या विकण्यासाठी संधी शोधत आहे. अनेक कार्यालये रिकामी झाली आहेत. याशिवाय बायजू कंपनीच्या तरलतेच्या समस्येवर मात करण्यासाठी बाहेरील निधीच्या वितरणाकडे लक्ष देत आहे.

हेही वाचाः सरकार आर्थिक वर्ष २०२४ च्या दुसऱ्या सहामाहीत ६.५५ लाख कोटींचे कर्ज घेणार; २० हजार कोटींचे सॉवरेन ग्रीन बॉन्ड जारी करणार

या महिन्याच्या सुरुवातीला कंपनीने आपल्या कर्जदारांना एक प्रस्ताव पाठवला होता की, ती पुढील ६ महिन्यांत १.२ अब्ज डॉलरच्या संपूर्ण कर्जाची परतफेड करणार आहे. त्याचबरोबर ३०० दशलक्ष डॉलर्सचे कर्ज पुढील ३ महिन्यांत फेडण्याचे आश्वासनही देण्यात आले होते. कंपनी पुनर्बांधणीसह २ उपकंपनी युनिट्स विकण्याचा विचार करीत आहे. या संस्था ग्रेट लर्निंग आणि यूएस आधारित एपिक आहेत. या कंपन्या विकून कर्ज फेडण्याची तयारी सुरू केली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 4000 to 5000 people will be affected as byjus prepares to lay off employees once again vrd

First published on: 27-09-2023 at 14:08 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×