पीटीआय, नवी दिल्ली

कॅनरा बँक आणि इंडियन बँकेसह सार्वजनिक क्षेत्रातील चार बँकांनी बुधवारी केंद्राला आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी लाभांशापोटी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना ६,४८१ कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. बँक ऑफ बडोदाने २,५१४.२२ कोटी रुपये, कॅनरा बँकेने १,८३८.१५ कोटी रुपये तर चेन्नईस्थित इंडियन बँकेने १,१९३.४५ कोटी रुपयांचा धनादेश दिला. बँक ऑफ इंडियानेदेखील ९३५.४४ कोटी रुपयांचा लाभांश दिला. व्यतिरिक्त, मुंबईस्थित वित्तीय संस्था एक्झिम बँकेने २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी २५२ कोटी रुपयांचा लाभांश दिला.

IAS Pooja Khedkar father Dilip Khedkar
Pooja Khedkar Father First Reaction : IAS पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “माझ्या मुलीने चूक…”
IAS Puja Khedkar
IAS Pooja Khedkar : पूजा खेडकरचा आणखी एक प्रताप समोर; दिव्यांग असल्याचे सांगून UPSC परीक्षेत मिळवली सूट
Bank loan disbursement is expected to increase at the rate of 13 to 15 percent
बँकांचे कर्ज वितरण १३ ते १५ टक्के दराने वाढण्याचा अंदाज
vivek oberoi says after bollywood ostracized him he focused on business
बॉलीवूडने बहिष्कार टाकल्यावर व्यवसाय करून घर चालवलं; विवेक ओबेरॉय वस्तुस्थिती मांडत म्हणाला, “आज २९ कंपन्यांमध्ये…”
Union Budget 2024 Updates in Marathi
Tax Slabs 2024-25 Budget 2024 Updates: अर्थसंकल्पात ऑटो क्षेत्रासाठी तब्बल ३५०० कोटींची तरतूद
pooja khedkar ias news in marathi
IAS पूजा खेडकर यांचे कारनामे दिल्लीपर्यंत पोहोचले; थेट पंतप्रधान कार्यालयानं घातलं लक्ष, LBSNAA नंही मागवला अहवाल!
maharashtra mlc election final result list (1)
Maharashtra MLC Election Result: विधानपरिषद निवडणुकीत जयंत पाटील पराभूत; नेमकी कुणाची मतं कुणाकडे गेली?
IAS Pooja Khedkar WhatsApp Chat Pune Collector Office
Pooja Khedkar Chat : “सर्व व्यवस्था करून ठेवा…”, पूजा खेडकर यांचे ‘ते’ व्हॉट्सॲप चॅट व्हायरल

गेल्या महिन्यात पुण्यात मुख्यालय असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रनेदेखील ८५७ कोटी रुपये लाभांश केंद्राला दिला आहे. सरकारी बँकांकडून सरकारच्या तिजोरीत आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी एकूण १८,००० कोटी रुपयांची भर लाभांशरूपाने पडण्याची आशा आहे. आधीच्या म्हणजेच २०२२-२३ या आर्थिक वर्ष बँकांकडून सरकारला १३,८०४ कोटी रुपयांचा लाभांश प्राप्त झाला होता.