लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई: पर्यटनाशी संबंधित सेवा देणारे संकेतस्थळ असणाऱ्या ‘इक्सिगो’ची प्रवर्तक असलेल्या ‘ली ट्रॅव्हन्यूज टेक्नॉलॉजी’च्या समभागाने मंगळवारी बाजार पदार्पणालाच गुंतवणूकदारांना ७८ टक्के परतावा दाखवला.

Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
vivek oberoi says after bollywood ostracized him he focused on business
बॉलीवूडने बहिष्कार टाकल्यावर व्यवसाय करून घर चालवलं; विवेक ओबेरॉय वस्तुस्थिती मांडत म्हणाला, “आज २९ कंपन्यांमध्ये…”
Suryakumar Yadav and Rashid Khan Banter After Surya sweep Shot Video Viral
VIDEO: सूर्यकुमारच्या सारख्या फटक्यांमुळे रशीद वैतागला; थेट त्याच्याकडे जाऊन म्हणाला, “मला स्वीप मारणं बंद कर”!
Car Sales Drop in May 2024
देशातील बाजारात ‘या’ २ कारकडे ग्राहकांनी फिरवली पाठ; ३० दिवसात फक्त ४ लोकांनी केली खरेदी
Saurabh Netravalkar Straight Answer About Working After T20 World Cup
सुपर ८ फेरी गाठताच सौरभ नेत्रावळकरने कंपनीत केला कॉल; मॅचनंतर काम करण्याबाबत स्पष्टच म्हणाला, “मला कुणी त्रास..”
ह्युंदाई मोटर इंडियाचा ‘महा-आयपीओ’ कसा असेल? देशात आजवरचा सर्वांत मोठा ठरणार?
Aditya Birla Sun Life Quant Fund open for investment latest news,
‘आदित्य बिर्ला सन लाइफ क्वांट फंड’ गुंतवणुकीस खुला
Devendra Fadnavis and Eknath shinde
लोकसभेतील पराभवानंतर महायुतीचा मोठा निर्णय, राज्य सरकारच्या ‘या’ महत्त्वाच्या प्रकल्पाला स्थगिती!

गेल्या आठवड्यात प्रत्येकी ९३ रुपयांनी सार्वजनिक प्रारंभिक विक्रीद्वारे गुंतवणूकदारांना मिळविलेल्या कंपनीच्या समभागाचे शेअर बाजारात नोंदणी होताच सकाळच्या व्यवहारात १३५ रुपयांच्या पातळीवर व्यवहार सुरू झाले. त्यानंतरच्या व्यवहारात तो १६५.७२ रुपयांपर्यंत झेपावला. दिवसअखेर समभाग वितरित किमतीच्या तब्बल ७८.१९ टक्क्य़ांनी उंचावत अर्थात ७२.७२ रुपयांच्या वाढीसह स्थिरावला. ‘ली ट्रॅव्हन्यूज टेक्नॉलॉजी’ची पदार्पणातील कामगिरी त्यामुळे चमकदार ठरली आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे बाजारभांडवल ६,४२० कोटी रुपये आहे.

हेही वाचा >>>पेटीएमचा चित्रपट तिकीट व्यवसाय झोमॅटोकडे

‘इक्सिगो’ची प्रवर्तक असलेल्या ‘ली ट्रॅव्हन्यूज टेक्नॉलॉजी’ची प्रारंभिक समभाग विक्री १० जून ते १२ जूनदरम्यान पार पडली होती. यासाठी कंपनीने ८८ रुपये ते ९३ रुपयांचा किंमतपट्टा निश्चित केला होता. या प्रारंभिक समभाग विक्रीच्या माध्यमातून तिने ७४० कोटी रुपये उभारले आहेत. कंपनीच्या आयपीओला अखेरच्या दिवशी ९८.१० पट अधिक प्रतिसाद प्राप्त झाला होता.

आलोक बाजपेयी आणि रजनीश कुमार यांनी २००७ मध्ये या कंपनीची उभारणी केली होती. इक्सिगो हे देशातील आघाडीचे ऑनलाइन ‘ट्रॅव्हल ॲग्रीगेटर’ आहे. कंपनी प्रवाशांना त्यांच्या रेल्वे, हवाई, बस प्रवास तिकिटांचे आरक्षण आणि हॉटेल्स निवासासह, सहलींचे नियोजन आणि व्यवस्थापनास मदत करते. मार्च २०२३ अखेर आर्थिक वर्षात कंपनीचे एकूण उत्पन्न ५१७ कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे आधीच्या आर्थिक वर्षात ३८५ कोटी रुपये होते.