Central Government Employees DA : केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार वाढवणार असल्याची आनंदाची बातमी मोदी सरकार लवकरच देण्याची शक्यता आहे. सरकार महागाई भत्ता (DA) आणि फिटमेंट फॅक्टर वाढवण्याचा निर्णय घेऊ शकते. फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन १८,००० रुपयांवरून २६,००० रुपये होईल. दरवर्षी वाढत्या महागाईतून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता देते.

DA सुद्धा वाढण्याची शक्यता

केंद्र सरकार १ जुलैपासून डीए ४ टक्क्यांनी वाढवण्याची शक्यता आहे. या वाढीनंतर डीए ४२ टक्क्यांवरून ४६ टक्के होईल. अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाच्या अहवालावर विश्वास ठेवला तर सरकार जुलैमध्ये डीए वाढवण्याची घोषणा करू शकते. केंद्र सरकारने मार्चमध्ये अखेरचा डीए वाढवला होता. मार्चमध्ये वाढलेला डीए १ जानेवारी २०२३ पासून जोडला जाईल. ४ टक्क्यांच्या वाढीमुळे जर तुमचे किमान मूळ वेतन १८,००० रुपये असेल, तर जुलैपासून दर महिन्याला ७२० रुपये अधिक येतील. वार्षिक आधारावर जोडल्यास तुम्हाला ८६४० रुपयांची वाढ मिळेल.

Congress accuses the government that more and more families are in debt
अर्थव्यवस्थेची परिस्थिती बिकट! अधिकाधिक कुटुंबे कर्जाच्या विळख्यात सापडल्यचा काँग्रेसचा सरकारवर आरोप
public sector enterprises disinvestment in fy 24
निर्गुंतवणूक लक्ष्याची सरकारला पुन्हा हुलकावणी! सरकारी मालकीच्या कंपन्यांमधील हिस्सा विक्रीतून १६,५०७ कोटींचा लाभ
tuberculosis tb patients marathi news, pm narendra modi tb medicines marathi news
औषधांच्या तुटवड्यासंदर्भात क्षयरुग्णांचे पंतप्रधानांना पत्र
Why Protests in Hong Kong over New National Security Law Approved by Legislative Council Hong Kong
चीनकडून हाँगकाँगची गळचेपी? नवीन सुरक्षा कायद्याविषयी जगभर निषेधसूर का?

हेही वाचाः ‘मोदी सरकार सत्तेत असो वा नसो, अदाणी समूहाच्या कंपन्यांवर कोणताही परिणाम होणार नाही,’ राजीव जैन यांचा मोठा दावा

सरकार फिटमेंट फॅक्टरदेखील वाढवू शकते

डीए व्यतिरिक्त सरकार यावेळी फिटमेंट फॅक्टर देखील वाढवू शकते. सध्या फिटमेंट फॅक्टर २.५७ टक्के आहे. सरकार कर्मचाऱ्यांच्या पगाराची गणना करण्यासाठी फिटमेंट फॅक्टर वापरते. सरकार हे फिटमेंट फॅक्टर २.५७ वरून ३.६८ टक्क्यांपर्यंत वाढवू शकते.

हेही वाचाः मुकेश अंबानींच्या रिलायन्सला मागे टाकत ‘ही’ कंपनी बनली देशातील नंबर वन

डीए वाढीची गणना कशी केली जाते?

केंद्र सरकार एका निश्चित सूत्राच्या आधारे डीए आणि डीआरची गणना करते.