scorecardresearch

Premium

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; डीएबरोबर सरकार फिटमेंट फॅक्टरदेखील वाढवण्याची शक्यता

Central Government Employee DA : केंद्र सरकार १ जुलैपासून डीए ४ टक्क्यांनी वाढवण्याची शक्यता आहे. या वाढीनंतर डीए ४२ टक्क्यांवरून ४६ टक्के होईल. अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाच्या अहवालावर विश्वास ठेवला तर सरकार जुलैमध्ये डीए वाढवण्याची घोषणा करू शकते.

Central Government Employee DA
डीएबरोबर सरकार फिटमेंट फॅक्टरदेखील वाढवण्याची शक्यता

Central Government Employees DA : केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार वाढवणार असल्याची आनंदाची बातमी मोदी सरकार लवकरच देण्याची शक्यता आहे. सरकार महागाई भत्ता (DA) आणि फिटमेंट फॅक्टर वाढवण्याचा निर्णय घेऊ शकते. फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन १८,००० रुपयांवरून २६,००० रुपये होईल. दरवर्षी वाढत्या महागाईतून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता देते.

DA सुद्धा वाढण्याची शक्यता

केंद्र सरकार १ जुलैपासून डीए ४ टक्क्यांनी वाढवण्याची शक्यता आहे. या वाढीनंतर डीए ४२ टक्क्यांवरून ४६ टक्के होईल. अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाच्या अहवालावर विश्वास ठेवला तर सरकार जुलैमध्ये डीए वाढवण्याची घोषणा करू शकते. केंद्र सरकारने मार्चमध्ये अखेरचा डीए वाढवला होता. मार्चमध्ये वाढलेला डीए १ जानेवारी २०२३ पासून जोडला जाईल. ४ टक्क्यांच्या वाढीमुळे जर तुमचे किमान मूळ वेतन १८,००० रुपये असेल, तर जुलैपासून दर महिन्याला ७२० रुपये अधिक येतील. वार्षिक आधारावर जोडल्यास तुम्हाला ८६४० रुपयांची वाढ मिळेल.

harideep singh nijjar
पार्किंगजवळ अडवली गाडी, झाडल्या ५० गोळ्या; हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा थरारक घटनाक्रम वाचा!
Parineeti troll
“ही तर हद्द झाली…,” लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी परिणीती चोप्रा ट्रोल, अभिनेत्रीबद्दल नाराजी व्यक्त करत नेटकरी म्हणाले…
amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
sharad pawar narendra modi (1)
“पंतप्रधान मोदींचं ‘ते’ विधान क्लेशदायक”, शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका; दिले १९९३ च्या घडामोडींचे दाखले!

हेही वाचाः ‘मोदी सरकार सत्तेत असो वा नसो, अदाणी समूहाच्या कंपन्यांवर कोणताही परिणाम होणार नाही,’ राजीव जैन यांचा मोठा दावा

सरकार फिटमेंट फॅक्टरदेखील वाढवू शकते

डीए व्यतिरिक्त सरकार यावेळी फिटमेंट फॅक्टर देखील वाढवू शकते. सध्या फिटमेंट फॅक्टर २.५७ टक्के आहे. सरकार कर्मचाऱ्यांच्या पगाराची गणना करण्यासाठी फिटमेंट फॅक्टर वापरते. सरकार हे फिटमेंट फॅक्टर २.५७ वरून ३.६८ टक्क्यांपर्यंत वाढवू शकते.

हेही वाचाः मुकेश अंबानींच्या रिलायन्सला मागे टाकत ‘ही’ कंपनी बनली देशातील नंबर वन

डीए वाढीची गणना कशी केली जाते?

केंद्र सरकार एका निश्चित सूत्राच्या आधारे डीए आणि डीआरची गणना करते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-06-2023 at 19:37 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×