महारेराने ग्राहकांना नुकसानभरपाईपोटी जारी केलेले वारंटस वसूल व्हावे, यासाठी महारेरा सातत्याने संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयांच्या संपर्कात आहे. महारेराच्या पाठपुराव्यामुळे अनेक ठिकाणी संबंधित विकासकांच्या मिळकती( Properties) जप्त करून लिलावाच्या प्रक्रिया सुरू झालेल्या आहेत. लवकरच राज्यात आणखी काही ठिकाणी असे लिलाव होणार आहेत. परिणामी आपली मिळकत जप्त होऊ नये, यासाठी आता काही ठिकाणी विकासक पुढे येऊन या नुकसानभरपाईच्या रकमा भरत आहेत किंवा संबंधित ग्राहकांशी तडजोड करून नुकसानभरपाईचा प्रश्न निकाली काढत आहेत.

या पद्धतीने २० वारंटसपोटी मुंबई उपनगर, मुंबई शहर , रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील ११ विकासकांनी ८ कोटी ५७ लाख २६ हजार ८४६ रुपये एवढी रक्कम जमा केलेली आहे. महारेराने आतापर्यंत ६२४.४६ कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईच्या वसुलीसाठी १००७ वारंटस जारी केलेले आहेत. यापैकी आतापर्यंत १२४ वारंटसची ११३.१७ कोटीची रक्कम वसूल करण्यात महारेराला यश आलेले आहे. उर्वरित रक्कमही वसूल व्हावी यासाठी महारेरा सातत्याने प्रयत्नशील आहे.

Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
Pimpri road, road development works,
पिंपरी : रस्ते विकासाच्या ९० कोटींच्या कामात ‘रिंग’?
More than 20 thousand farmers objected to MMRDA notification
‘एमएमआरडीए’च्या अधिसूचनेला २० हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या हरकती
Smuggling of liquor from Goa by vehicle stuff of worth 61 lakh seized
वाहनातून गोव्यातील मद्यसाठ्याची तस्करी, ६१ लाखाचा मुद्देमाल जप्त

हेही वाचाः ओळखपत्राशिवाय २००० रुपयांच्या नोटा बदलण्याची परवानगी का? RBI अन् SBI विरोधात भाजप नेता पोहोचला दिल्ली कोर्टात

ज्यांनी रकमा जमा केल्यात किंवा ग्राहकांशी तडजोडी केल्या त्यात मुंबई उपनगरातील विधी रिअल्टर्स, स्कायस्टार बिडकाॅन, लोहितका प्रॉपर्टीज, व्हिजन डेव्हलपर्स आणि विजयकमल प्रॉपर्टीज अशा ५ विकासकांचा यात समावेश असून, त्यांनी अनुक्रमे ४ कोटी १ लाख ९७ हजार, ५७ लाख ८४ हजार, १७ लाख ४० हजार, ३७ लाख, २५ लाख ६६ हजार १३७ अशी एकूण ५ कोटी ३९ लाख ८७ हजार १३७ एवढ्या रकमेचे दावे निकाली काढलेले आहेत. रक्कम जमा केलेली आहे.

हेही वाचाः ३० सप्टेंबरनंतर २००० रुपयांच्या नोटेचे काय होणार? आरबीआय गव्हर्नर म्हणतात…

यातील व्हिजन डेव्हलपर्स प्रकरणी उच्च न्यायालयात समेट झालेला आहे. तर विधी रिअल्टर्स आणि विजयकमल प्रॉपर्टीज यांनी ग्राहकांशी तडजोड करून, तडजोडीच्या प्रतींची उप निबंधकांच्या कार्यालयात रितसर नोंदणी करून घेतलेली आहे. मुंबई शहरातील मातोश्री प्रॉपर्टीज, श्रीसदगुरू डिलक्स आणि फलक डेव्हलपर्सनीही ३ वारंटसचे अनुक्रमे २२ लाख ५० हजार, १५ लाख ७५ हजार आणि ९ लाख ७० हजार ५५० असे एकूण ४७ लाख ९५ हजार ५५० जमा करण्यात आलेले आहेत. अलिबाग भागातील( जिल्हा रायगड) विनय अग्रवाल या विकासकाकडे १३ वारंटसपोटी नुकसानभरपाईची १ कोटीच्या वर देणी आहेत. त्यापैकी त्यांनी न्यायाधिकरणाकडे ( Tribunal) ७८ लाख ८५ हजार ४३१ रुपये एवढी रक्कम जमा केलेली आहे. यातून १० वारंटसची पूर्तता होणार आहे.

ठाणे येथील रवी डेव्हलपर्स आणि नताशा डेव्हलपर्स या दोन विकासकांनी तडजोड करून एकेक वारंटसपोटी अनुक्रमे १ कोटी १९ लाख ५८ हजार ७२८ आणि ७१ लाख रुपये जमा केलेले आहेत, असे एकूण ११ विकासकांनी २० वारंटसपोटी ८ कोटी ५७ लाख २६ हजार ८४६ रुपये जमा केलेले आहेत. काहींनी याबाबतचे दावे निकाली काढलेले आहेत.