मुंबई: जागतिक सागरी क्षेत्रात भारताचे महत्त्वाचे स्थान आहे. तब्बल ७,५१७ किलोमीटर लांबीच्या सागरी किनारपट्टीद्वारे भारताच्या ९५ टक्के परराष्ट्र व्यापार हाताळला जातो, जे देशातील नील अर्थव्यवस्थेच्या आर्थिक शक्यतांवर प्रकाश टाकते, असे केंद्रीय जहाज वाहतूक मंत्रालयाचे उपमहासंचालक, डॉ. पांडुरंग राऊत यांनी प्रतिपादन केले.

देशातील १२ प्रमुख बंदरे आणि सुमारे २०० लघु बंदरांद्वारे दरवर्षी अंदाजे १,५५० दशलक्ष टन मालाची हाताळणी केली जाते. भारताच्या एकूण व्यापाराच्या दृष्टीने हे प्रमाण ९५ टक्के आहे, असे डॉ. राऊत ‘असोचॅम’द्वारे आयोजित परिषदेत म्हणाले. सागर माला कार्यक्रमांतर्गत, भारताच्या किनाऱ्यावर ११,७५२ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह सुमारे ८१ प्रकल्प राबविले जात आहेत. तसेच, किनारी विकास कार्यक्रमांतर्गत २१,००० तरुणांना आधीच प्रशिक्षण देण्यात आले आहे आणि ६,५४० कोटी रुपयांच्या खर्चाने ३७ मासेमारी बंदर प्रकल्प विकसित केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

Story img Loader