नवी दिल्ली : आघाडीची हवाई वाहतूक कंपनी असलेल्या इंडिगोला सरलेल्या सप्टेंबर तिमाहीत वाढलेल्या इंधन खर्चापोटी आणि तांत्रिकदृष्टया बिघडल्यामुळे ९८६.७ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत कंपनीने १८८.९ कोटी रुपयांचा नफा नोंदवला होता.

सुमारे चारशेहून अधिक विमांनाची संख्या असलेली देशातील मोठ्या विमान कंपनीकडील ७० विमाने सध्या तांत्रिकदृष्टया बिघडल्याने झेपावू शकत नाहीत.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

सप्टेंबरच्या अखेरीस, वाहकाकडे ४१० विमानांचा ताफा होता. परकीय चलनातील अस्थिरतेचा प्रभाव वगळता, चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत इंडिगोचा तोटा ७४६.१ कोटी रुपये होता.  दुसऱ्या तिमाहीत इंधनाचा खर्च १२.८ टक्क्यांनी वाढून ६,६०५.२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो मागील वर्षी याच कालावधीत ५,८५६ कोटी रुपये होता. याबरोबरच विमान आणि इंजिनचे भाडे ७६३.६कोटी रुपयांवर पोहोचले, जे मागील वर्षीच्या याच कालावधीत केवळ १९५.६ कोटी रुपये होते. सरलेल्या सप्टेंबर तिमाहीत एकूण खर्च सुमारे २२ टक्क्यांनी वाढून १८,६६६.१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

हेही वाचा >>> ‘मुद्रा’ कर्जांची मर्यादा दुपटीने वाढून २० लाखांवर

विमान कंपनीची घोडदौड कायम असून पुढेही असाच विस्तार चालू राहील. वार्षिक आधारावर महसूल १४.६ टक्क्यांनी वाढून दुसऱ्या तिमाहीत तो १७,८०० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. इंडिगो आपल्या सेवांचा विस्तार करत, विद्यमान आर्थिक वर्षात अधिक आंतरराष्ट्रीय स्थळांसाठी सेवा सुरू करणार आहे, अशी माहिती इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर्स यांनी दिली.

विमानातील खराबी आणि त्यासंबंधित दुरुस्ती खर्च वाढल्यामुळे कंपनीच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. मुख्यतः प्रॅट अँड व्हिटनी इंजिन समस्यांमुळे अनेक विमाने झेपावू शकत नाहीत. याबरोबर भू-राजकीय तणावामुळे खनिज तेलाच्या किमतीतील चढ-उतार वाढल्याने इंधनावरील खर्चात मोठी वाढ सोसावी लागली आहे.

तांत्रिकदृष्टया ना-दुरुस्त असलेल्या विमानांची संख्या वर्षाच्या अखेरीस ६० वर आणण्यात येईल आणि पुढील आर्थिक वर्षाच्या सुरूवातीस ती संख्या ४० पर्यंत खाली येईल, असे इंडिगोचे मुख्य वित्तीय अधिकारी गौरव नेगी म्हणाले.

प्रवासी वाढले

सप्टेंबर तिमाहीत, हवाई वाहतूक कंपनीच्या सेवांचा २.७८ कोटी प्रवाशांची लाभ घेतला, प्रवाशांची संख्या गेल्यावर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत जवळपास ६ टक्क्यांनी वाढली आहे. उत्पन्न प्रति किलोमीटर मागील वर्षीच्या ४.४४ वरून सप्टेंबर तिमाहीत २.३ टक्क्यांनी वाढून ४.५५ वर पोहोचला आहे. इंडिगोची मूळ कंपनी इंटरग्लोब एव्हिएशन इंडिगो व्हेंचर्स फंडमध्ये २९५ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. हा निधी विमान वाहतूक आणि संबंधित क्षेत्रांसाठी वापरला जाणार आहे.