scorecardresearch

Premium

बांधकाम उद्योगाला आकार देण्यात ‘एआय’च्या भूमिकेवर श्वेतपत्रिका, ऑक्टोबरमध्ये होत असलेल्या ‘काँक्रीट शो’मध्ये अनावरण

१८ ते २० ऑक्टोबर २०२३ रोजी गोरेगांवस्थित मुंबई प्रदर्शन संकुलात होत असलेल्या त्याच्या नवव्या आवृत्तीत, या उद्योगासमोरील आव्हानांसह, कृत्रिम प्रज्ञा (एआय), मशीन लर्निंग, थ्रीडी प्रिटिंग अशा नवतंत्रज्ञानाच्या भूमिकेचा ऊहापोह करणाऱ्या श्वेतपत्रिका प्रसिद्ध होऊ घातली आहे.

9th edition, World of Concrete India (WIKI), october, mumbai, concrete industry,
बांधकाम उद्योगाला आकार देण्यात ‘एआय’च्या भूमिकेवर श्वेतपत्रिका, ऑक्टोबरमध्ये होत असलेल्या ‘काँक्रीट शो’मध्ये अनावरण ( image courtesy – World of Concrete India FB page )

लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबईः अत्याधुनिक काँक्रीट तंत्रज्ञान, उपकरणे आणि उद्योगाला आकार देणाऱ्या नवकल्पना प्रदर्शित करणारे महत्त्वपूर्ण व्यासपीठ म्हणून ‘वर्ल्ड ऑफ काँक्रीट इंडिया’ची विशेष भूमिका राहिली आहे. १८ ते २० ऑक्टोबर २०२३ रोजी गोरेगांवस्थित मुंबई प्रदर्शन संकुलात होत असलेल्या त्याच्या नवव्या आवृत्तीत, या उद्योगासमोरील आव्हानांसह, कृत्रिम प्रज्ञा (एआय), मशीन लर्निंग, थ्रीडी प्रिटिंग अशा नवतंत्रज्ञानाच्या भूमिकेचा ऊहापोह करणाऱ्या श्वेतपत्रिका प्रसिद्ध होऊ घातली आहे.

session Loksatta Arthabhan Income after retirement ville parle Thursday
निवृत्तीनंतरही नियमित उत्पन्न मिळविता येणे शक्य! पार्ल्यात येत्या गुरुवारी ‘लोकसत्ता अर्थभान’चे सत्र
disney hotstar and Gautam Adani
डिस्ने हॉटस्टार गौतम अदाणींकडे जाण्याची शक्यता, नेमकं प्रकरण काय?
Naxalite killed Balaghat district
बालाघाट जिल्ह्यात हॉकफोर्ससोबतच्या चकमकीत एक नक्षलवादी ठार; १४ लाखांचे होते बक्षीस
vinod mina
कल्याणमध्ये रेल्वे तंत्रज्ञाचा घरात संशयास्पद मृत्यू

तब्बल ५ कोटींहून अधिक लोकांना थेट रोजगार देणाऱ्या आणि देशाच्या जीडीपीमध्ये ९ टक्के योगदान असणाऱ्या भारताच्या बांधकाम उद्योगाची उलाढाल २०२५ पर्यंत १.४ लाख कोटी डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. वाढीच्या याच उमद्या शक्यतांचा सखोल अभ्यास करण्यासाठी आणि त्या दिशेने उपलब्ध संधी जगापुढे ठेवण्यासाठी ‘वर्ल्ड ऑफ काँक्रीट इंडिया २०२३’ हे मुख्य व्यासपीठ राहिल, असे या तीन दिवसांच्या उपक्रमाचे आयोजक इन्फॉर्मा मार्केट्स इन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक योगेश मुद्रास यांना सांगितले. यानिमित्ताने अनावरण होत असलेली श्वेतपत्रिका, कंपन्यांचे सीईओ आणि सीटीओ यांची गोलमेज परिषद आणि वेगवेगळ्या चर्चासत्रांमध्ये नावीन्यता आणि शाश्वततेवर लक्ष केंद्रित करत, नवीन तंत्रज्ञानात्मक आणि नियामक प्रवाहांना वाट मोकळी करून दिली जाईल. यातून सरकारलाही अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने या महत्त्वाच्या क्षेत्राचे अधिक प्रभावीपणे नियमन व प्रोत्साहनाची भूमिका बजावता येईल, असा विश्वास मुद्रास यांनी व्यक्त केला.

बांधकाम क्षेत्रातून वाढ व विकासाची क्षमता पाहता, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि कौशल्य विकासाच्या आव्हानाचे तातडीने समाधान होणे अपेक्षित असल्याचे बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे मानद सचिव अनिरुद्ध नाखवा म्हणाले. कौशल्यप्राप्त मनुष्यबळाचे प्रमाण सध्याच्या पातळीवरून ४० ते ५० टक्क्यांनी वाढविले गेल्यास खूप मोठा बदल दिसून येईल, असे ते म्हणाले. बांधकाम उद्योगाचे प्रतिनिधित्व करणारे १० हजारांहून अधिक व्यवसाय प्रतिनिधी आणि देशा-विदेशातून २०० हून अधिक प्रदर्शक त्याची अत्याधुनिक उत्पादने, तंत्रज्ञान व नावीन्यपू्र्ण सेवांसह या बी२बी उपक्रमात सहभागी होत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 9th edition of the world of concrete india wiki in october at mumbai print eco news asj

First published on: 28-09-2023 at 12:42 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×