scorecardresearch

Premium

निवृत्तीनंतरही नियमित उत्पन्न मिळविता येणे शक्य! पार्ल्यात येत्या गुरुवारी ‘लोकसत्ता अर्थभान’चे सत्र

तरुण पगारदारांसाठी दिशादर्शक ‘लोकसत्ता अर्थभान’च्या या सत्राचे मुख्य प्रायोजक ‘क्वांटम म्युच्युअल फंडा’च्या सहयोगाने करण्यात आले आहे.

session Loksatta Arthabhan Income after retirement ville parle Thursday
निवृत्तीनंतरही नियमित उत्पन्न मिळविता येणे शक्य! पार्ल्यात येत्या गुरुवारी ‘लोकसत्ता अर्थभान’चे सत्र (छायाचित्र- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबईः निवृत्तिवेतन लाभ हा खरे तर सेवानिवृत्तांना सतत उत्पन्न आणि निर्धोक जीवनाची खात्री देतो. पण सध्या शासकीय आणि काही संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांपुरता मर्यादित असलेला हा लाभ, सर्वांनाच मिळविता येणे शक्य आहे. आपल्या निवृत्तीची तरतूद आपणच करण्याचे मार्ग आणि नियोजनाची मांडणी येत्या गुरुवारी ‘लोकसत्ता अर्थभान’च्या विशेष सत्रातून केली जाणार आहे.

Nitisha Kaul sent back to uk
युकेतून भारतात आलेल्या काश्मिरी पंडित प्राध्यापिकेला इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी परत पाठवलं मायदेशी; नेमकं प्रकरण काय?
Odisha BJP
ओडिशात BJD ला मोठा धक्का! मुख्यमंत्री पटनायकांच्या जवळचा महत्त्वाचा नेता भाजपात दाखल!
Nilwande project
निळवंडे प्रकल्पाचे श्रेय घेण्यासाठी नगरमधील नेत्यांमध्ये स्पर्धा
Investors adopted a cautious stance in the backdrop of monetary policy by the Reserve Bank
पतधोरणाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांचा सावध पवित्रा; सेन्सेक्स-निफ्टी किरकोळ घसरणीसह बंद

कमावत्या वयातच आयुष्यासाठी ठरविलेल्या आर्थिक लक्ष्यांना गाठता येऊ शकते. म्हणूनच याच वयात सेवानिवृत्तीनंतरच्या जीवनाची काळजी घेणारे नियोजन आणि गुंतवणुकांची दिशाही ठरायला हवी. त्या अंगाने तरुण पगारदारांसाठी दिशादर्शक ‘लोकसत्ता अर्थभान’च्या या सत्राचे मुख्य प्रायोजक ‘क्वांटम म्युच्युअल फंडा’च्या सहयोगाने करण्यात आले आहे. गुरुवार, १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता, लोकमान्य सेवा संघ, पु. ल. देशपांडे सभागृह, तिसरा मजला, राम मंदिर रोड, विलेपार्ले (पूर्व) येथे हा कार्यक्रम होत आहे.

हेही वाचा… रिझर्व्ह बँकेच्या ‘उद्गम’ संकेतस्थळाशी ३० बँका संलग्न

आर्थिक स्वयंनिर्भरता ही उत्पन्नांतून खर्च वजा जाता राहणाऱ्या थोड्या थोडक्या का होईना पण नियमित बचत आणि गुंतवणुकीतून शक्य आहे. याची उकल आर्थिक नियोजनकार कौस्तुभ जोशी आणि शेअर गुंतवणुकीचे अभ्यासक व स्तंभलेखक अजय वाळिंबे हे या कार्यक्रमातून करतील. उपस्थित गुंतवणूक-उत्सुकांना या तज्ज्ञांना या निमित्ताने थेट प्रश्नही विचारता येतील.

निवृत्तिवेतनाचा लाभ सर्वांनाच!

सहभाग

० कौस्तुभ जोशी (आर्थिक नियोजन तज्ज्ञ)

० अजय वाळिंबे (शेअर गुंतवणूक अभ्यासक)

कधी: गुरुवार, १२ ऑक्टोबर २०२३, सायंकाळी ५.३० वाजता

कुठे: लोकमान्य सेवा संघ, पु. ल. देशपांडे सभागृह, टिळक मंदिर रोड, विले पार्ले (पूर्व)

म्युच्युअल फंडातील गुंतवणुका बाजारातील जोखमीच्या अधीन असतात, योजनेसंबंधी सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A session loksatta arthabhan on income after retirement will be held in ville parle on thursday print eco news dvr

First published on: 07-10-2023 at 11:23 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×