कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आज जारी केलेल्या तात्पुरत्या वेतनपट आकडेवारीत ईपीएफओमध्ये सप्टेंबर 2023 मध्ये एकूण १७.२१ लाख सदस्यांची भर पडली आहे. आधीच्या महिन्यात म्हणजे ऑगस्ट २०२३ च्या तुलनेत २१,४७५ नव्या सदस्यांची भर पडली आहे. तर सप्टेंबर २०२२ च्या तुलनेत ३८,२६२ इतकी सदस्यसंख्या वाढली आहे.

सप्टेंबर २०२३ मध्ये सुमारे ८.९२ लाख नवीन सदस्यांनी नोंदणी केली आहे. या नव्या सदस्यांमध्ये १८-२५ वर्षे वयोगटातील सदस्य हे या महिन्यादरम्यान जोडल्या गेलेल्या एकूण नवीन सदस्यांच्या ५८.९२ टक्के आहेत. देशातील संघटित क्षेत्रातील कर्मचारी वर्गात सामील होणारे बहुतांश सदस्य हे तरुण आहेत, जे बहुधा प्रथमच नोकरी शोधणारे आहेत.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हेही वाचाः सुब्रतो रॉय यांच्या निधनानंतर मोदी सरकारला होणार मोठा फायदा, हजारो कोटी रुपये तिजोरीत येण्याची शक्यता

वेतनपट आकडेवारीनुसार, अंदाजे ११.९३ लाख सदस्य बाहेर पडले आणि ईपीएफओमध्ये पुन्हा सामील झाले. मागील महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर २०२३ मध्ये ३.६४ लाख सदस्य बाहेर पडले असून, बाहेर पडणाऱ्यांच्या संख्येत १२.१७ टक्क्यांनी घट झाली आहे. ईपीएफओ मधून बाहेर पडणाऱ्या सदस्यांची संख्या जून २०२३ पासून कमी होत आहे, असेही आकडेवारीत अधोरेखित केले आहे.

हेही वाचाः गौतम सिंघानियाच्या पत्नीनं घटस्फोटासाठी ठेवली मोठी अट; केली ‘एवढ्या’ कोटींची मागणी

लिंगनिहाय वेतनपट विश्लेषणानुसार, या महिन्यात जोडल्या गेलेल्या एकूण ८.९२ लाख नवीन सदस्यांपैकी सुमारे २.२६ लाख नवीन महिला सदस्य असून, त्या प्रथमच ईपीएफओमध्ये सामील झाल्या आहेत. तसेच महिन्याभरात दाखल झालेल्या एकूण महिला सदस्यांची संख्या ३.३० लाख इतकी होती. वेतनपट आकडेवारीचे राज्यनिहाय विश्लेषण असे दर्शविते की महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात आणि हरियाणा या ५ राज्यांमध्ये नव्याने जोडली गेलेली ईपीएफओ सदस्य संख्या सर्वाधिक आहे. एकूण सदस्यसंख्येत या राज्यांचा वाटा सुमारे ५७.४२ टक्के असून, या महिन्यात एकूण ९.८८ लाख सदस्यांची भर पडली आहे. सर्व राज्यांमध्ये महाराष्ट्र महिनाभरात एकूण २०.४२ टक्के सदस्य संख्या जोडत आघाडीवर आहे.

उद्योग-निहाय आकडेवारीची मासिक तुलना साखर उद्योग, कुरिअर सेवा, लोह आणि पोलाद, रुग्णालये, ट्रॅव्हल एजन्सी इत्यादींमधील आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या सदस्यांमध्ये लक्षणीय वाढ दर्शवते. खरं तर वेतनपट आकडेवारी तात्पुरती आहे, कारण डेटा निर्मिती ही एक निरंतर प्रक्रिया आहे आणि कर्मचाऱ्यांची माहिती अद्ययावत करणे ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे मागील आकडेवारी दर महिन्याला अद्ययावत केली जाते.

Story img Loader