वृत्तसंस्था, नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून संकटांनी घेरल्या गेलेल्या अदानी समूहाने, यादरम्यान काही कंपन्यांची मुख्यालये मुबंईतून अहमदाबादला हलविली आहेत. यात एसीसी आणि अंबुजा सिमेंट या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांतील महत्त्वाच्या विभागांचे कामकाज सध्या अहमदाबादमधून सुरूही झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समूहाने मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात ६.५ अब्ज डॉलरला एसीसी आणि अंबुजा सिमेंट या कंपन्यांची खरेदी केली. तेव्हा या कंपन्यांची मुख्यालये मुंबईत होती. या कंपन्यांचा ताबा मिळाल्यानंतर त्यातील प्रमुख विभागांचे कामकाज अहमदाबादला हलवण्यात आले. त्यामुळे या कंपन्यांचे प्रशासकीय कामकाज तेथून होऊ लागले आहे. कंपनीतील अनेक वरिष्ठ अधिकारी हे अहमदाबादमध्ये आणि त्यांचे कनिष्ठ अधिकारी मुंबईत अशी स्थिती आहे. त्यामुळे त्यांना वारंवार एका शहरातून दुसऱ्या शहरात चकरा माराव्या लागत आहेत. या त्रासाला कंटाळून अनेक जण बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adani companies are headquartered in gujarat from mumbai ysh
First published on: 01-04-2023 at 00:02 IST