लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : अदानी समूहाने अमेरिकी कंपनी जीक्यूजी पार्टनर्सला समूहातील चार कंपन्यांच्या समभागांची सुमारे १५,४४६ कोटी रुपयांनी विक्री केली. अदानी समूहातील अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड, अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड, अदानी ट्रान्समिशन लिमिटेड आणि अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडमधील सुमारे १७.२ कोटी समभाग एक गठ्ठा माध्यमातून विक्री केले. जीक्यूजी पार्टनर्सच्या अदानी समूहातील समभाग खरेदीमुळे त्यांना भारतीय पायाभूत सुविधांच्या विकासातील वाढीसाठी एक प्रमुख गुंतवणूकदार बनवले आहे, असे मुंबई शेअर बाजाराला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Job Opportunity Recruitment at AI Airport Services Limited
नोकरीची संधी: एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये पदभरती
Yamaha introduces vibrant new color options across the MT15 V2 Fascino and Ray ZR portfolios Know Features And price
ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह यामाहा इंडियाने ‘या’ दुचाकींना केलं उपडेट; पाहा कलर ऑप्शन…
Kinetic Green introduces E Luna an electric scooter for gig workers
गिग’ कामगारांसाठी आता ई-लुना, कायनेटिक ग्रीन कंपनीचे पाऊल; १३० दुचाकींचे वितरण
Samsung launch of A Series Galaxy A55 5G and Galaxy A35 5G with awesome innovations With Offers
यूट्यूब प्रीमियम अन् आकर्षक ऑफर्ससह ‘या’ कंपनीच्या स्मार्टफोनची मार्केटमध्ये एंट्री; जाणून घ्या किंमत

घोडदौड कायम

अदानी समूहातील कंपन्यांनी गुरुवारच्या सत्रात घोडदौड कायम राखली. समूहातील सर्व दहा सूचिबद्ध कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल ७.८६ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तर गेल्या दोन सत्रांमध्ये दहा कंपन्यांच्या एकूण बाजारभांडवलात ७४,३०२.४७ कोटी रुपयांची भर पडली आहे.