scorecardresearch

Premium

आदित्य बिर्ला समूह आता ज्वेलरी रिटेल व्यवसायात उतरणार; ५००० कोटींची गुंतवणूक करणार

दागिन्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून समूहाचा व्यवसाय पोर्टफोलिओ विकसित होईल आणि भारतीय ग्राहकांना दागिन्यांमध्ये अधिक पर्याय उपलब्ध होतील, असंही आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी सांगितले.

Aditya Birla Group jewellery retail business
आदित्य बिर्ला समूह आता ज्वेलरी रिटेल व्यवसायात

टेलिकॉम, टेक्सटाईल, सिमेंट, मेटल आणि इतर क्षेत्रात आपला व्यवसाय वाढवल्यानंतर आदित्य बिर्ला ग्रुप आता ब्रँडेड दागिन्यांच्या किरकोळ व्यवसायात आपलं नशीब आजमावणार आहे. बिर्ला समूह दागिन्यांच्या व्यवसायात उतरण्यासाठी ५००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे, अशी माहिती आदित्य बिर्ला समूहाने आज दिली. दागिन्यांच्या व्यवसायात प्रवेश केल्यानंतर बिर्ला समूहाची थेट स्पर्धा कल्याण ज्वेलर्स आणि टाटाच्या तनिष्क ब्रँडशी होणार आहे.

दागिन्यांच्या ब्रँडचं नाव काय असेल?

ज्वेलरी व्यवसायाचे नाव “नॉव्हेल ज्वेल्स” (Novel Jewels Ltd) असेल, असंही आदित्य बिर्ला समूहाच्या निवेदनात म्हटले आहे. या व्यवसायासाठी आदित्य बिर्ला समूह संपूर्ण देशभरात नॉव्हेल ज्वेल्स इनहाऊस ज्वेलरी ब्रँडसह मोठ्या स्वरूपात ज्वेलरी रिटेल स्टोअर्स उघडणार आहे.

manoj jarnage patil
“बाकीचं नंतर बघू, आधी माझ्या किडन्या तपासा”, मनोज जरांगेंच्या किडनीचा नेमका घोळ काय?
chandrashekhar bawankule
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर राजकीय हालचालींना वेग, भाजपाकडून ‘प्लॅन बी’ तयार? बावनकुळे म्हणाले…
Actor Vijay Antony reacts on Daughter Meera suicide
“मी तिच्याबरोबर मेलो,” १६ वर्षीय मुलीच्या आत्महत्येनंतर अभिनेत्याची भावुक पोस्ट; म्हणाला, “जिथे जात, धर्म, पैसा…”
ramdas kadam on uddhav thackeray aaditya
“आदित्यसाहेब आणि त्यांचा बाप…”, रामदास कदमांची टीका; म्हणाले, “…आता दोघंही पळतायत!”

हेही वाचाः ४० हजार रुपये दरमहा खात्यात येणार, तुमच्या आई-वडिलांसाठी सर्वोत्तम गुंतवणूक योजना

भारतीय ग्राहकांना नवीन पर्याय मिळणार

दागिन्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून समूहाचा व्यवसाय पोर्टफोलिओ विकसित होईल आणि भारतीय ग्राहकांना दागिन्यांमध्ये अधिक पर्याय उपलब्ध होतील, असंही आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी सांगितले. भारतीय वाढत्या उत्पन्नातून मुक्तता मिळवण्यासाठी ते आता समजूतदार झाले आहेत आणि डिझाईनच्या नेतृत्वाखालील उच्च गुणवत्तेच्या दागिन्यांची निवड करीत आहेत. लाइफस्टाइल रिटेलमध्ये आम्ही आधीच उपस्थित आहोत आणि आता दागिन्यांचा व्यवसाय आम्हाला ग्राहकांच्या प्राधान्यांची बारकाईने समजून घेण्यास मदत करणार असल्याचंही कुमार मंगलम बिर्ला म्हणालेत.

उद्दिष्ट काय आहे?

देशातील डिझाईन आधारित बेस्पोक आणि उच्च दर्जाच्या दागिन्यांची वाढती मागणी पूर्ण करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. नॉव्हेल ज्वेल्स देशाच्या विविध प्रादेशिक गरजा आणि अनोख्या डिझाईन्ससह राष्ट्रीय ब्रँड तयार करून ग्राहकांचा अनुभव बदलण्याचा प्रयत्न करेल, असंही कंपनीचे म्हणणे आहे. आदित्य बिर्लाची नॉव्हेल ज्वेल्स बाजारात तनिष्क, कल्याण ज्वेलर्स, रिलायन्स ज्वेलर्स यांसारख्या ब्रँड्सशी स्पर्धा असेल, ज्यांनी किरकोळ व्यवसायात आपला व्यवसाय प्रस्थापित केला आहे. भारताच्या रत्न आणि दागिन्यांच्या बाजारपेठेचा एकूण देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) सुमारे ७ टक्के वाटा आहे. २०२५ पर्यंत ज्वेलरी मार्केट ९० बिलियन डॉलरपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.

हेही वाचाः आता कार्डाशिवाय UPI द्वारे ATM मधून पैसे काढता येणार; ‘या’ बँकेने सुरू केली नवी सेवा

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-06-2023 at 16:48 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×