लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी ग्राहकांसाठी सोयीस्कर ठरेल अशा बँकेच्या सेवा त्यांच्या उंबरठ्यापर्यंत जाऊन देण्याच्या देशव्यापी मोहिमेची पायाभरणी म्हणून, बुधवारी जागतिक तंत्रज्ञान-सक्षम सेवा क्षेत्रातील अग्रणी बीएलएस इंटरनॅशनलशी धोरणात्मक भागीदारी बुधवारी जाहीर केली. यातून ही उन्नत सेवा प्रारंभिक टप्प्यांत देशातील निवडक ५८ शहरांमध्ये विस्तारली जाणार आहे.

Confusion over CrowdStrike company Falcon Sensor software update
प्रतीक्षा, खोळंबा, अपरिहार्यता! संगणकीय व्यवस्थेतील एका दोषाने जगभर गोंधळ
banks launched limited period special fixed deposits schemes
बँक ठेवींवर आता ७.३५ टक्क्यांपर्यंत लाभ ! विविध बँकांकडून अतिरिक्त व्याजदराच्या विशेष योजना
bank of barod state bank of india
सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांचे कर्ज महाग! स्टेट बँक, बँक ऑफ बडोदाकडून व्याजदरात वाढ
panvel ,cidco, cidco shop sale scheme
पनवेल: सिडकोची ४८ भूखंड, २१८ दुकानांची सोडत, दुकान विक्री योजनेच्या ऑनलाइन नोंदणीस आजपासून सुरुवात
nashik electric charging stations marathi news
इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग केंद्रांचा विस्तार, नाशिक शहरात आणखी नऊ केंद्रांना मान्यता
Action, illegal meat, Kalyan Dombivli ,
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत बेकायदा मांस विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई
e-vehicles, self-made battery packs ,
लवकरच स्वनिर्मित बॅटरी संचातून ई-वाहनांना ऊर्जा – ओला इलेक्ट्रिक
Bank Clinic service, bank customers,
‘एआयबीईए’च्या माध्यमातून बँक ग्राहकांसाठी विनामूल्य ‘बँक क्लिनिक’ सेवा

सार्वजनिक क्षेत्रातील १२ बँकांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘पीएसबी अलायन्स’ या स्वतंत्र कंपनीमार्फत ही सेवा बीएलएस इंटरनॅशनलच्या सहयोगाने घराघरापर्यंत पोहोचवली जाणार आहे. तीन वर्षांच्या कराराच्या अटींनुसार, बीएलएस इंटरनॅशनल निवडक १०० केंद्रांमध्ये सेवा प्रदात्यांच्या सहाय्यासह सर्व मूलभूत बँकिंग सेवा प्रदान करेल. ज्यामध्ये उत्तर, पश्चिम, पूर्व आणि ईशान्येकडील प्रदेश, ग्रामीण आणि निमशहरी भाग तसेच महानगरे आणि शहरी केंद्रांचा समावेश आहे. उंबरठ्यापर्यंत बँकिंग सेवा सुलभ करण्याचा या उपक्रमात, बीएलएस इंटरनॅशनलच्या कौशल्याचा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेतला जाईल.

हेही वाचा – ‘फॉक्सकॉन’ची पंतप्रधान मोदींना वाढदिवसाची भेट; भारतातील गुंतवणूक, व्यवसाय दुपटीने वाढविणार!

रिझर्व्ह बँकेने सध्या ७० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आणि अपंग व्यक्तींकडून विनंती केली गेल्यास मूलभूत बँकिंग सेवा घरपोच उपलब्ध करून देणे बँकांना बंधनकारक केले आहे. तर ताज्या मोहिमेनुसार, पीएसबी अलायन्सने सर्वांसाठी प्रगत बँकिंग सेवा घरपोच उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

हेही वाचा – Gold-Silver Price on 20 September 2023: सोने खरेदी करणं झालं महाग, चांदीचीही भरारी, पाहा काय आहे आजचा भाव

या भागीदारीतून पुढे अंदाजे सव्वाकोटी ग्राहक व्यवहारांची पूर्तता करण्याचे प्रारंभिक लक्ष्य निर्धारीत करण्यात आल्याचे बीएलएस इंटरनॅशनलचे सहव्यवस्थापकीय संचालक शिखर अग्रवाल म्हणाले. त्यांच्या मते, डीएसबी अर्थात डोअरस्टेप बँकिंग सेवा केवळ ग्राहकांच्या सोयींमध्ये वाढ करणार नाही तर आर्थिक समावेशनाला चालना देण्याच्या दृष्टीकोनाशीदेखील ते सुसंगत पाऊल आहे. विशेषत: जेथे बँकांच्या शाखा नाहीत, अशा दुर्गम भागातील लोकांपर्यंत त्यांच्या दारात सोयीस्कर आणि वैयक्तिक धाटणीचे बँकिंग उपाय यातून प्रदान केले जातील.