मुंबईः ॲल्युमिनियमचे दरवाजे आणि खिडक्या, रेलिंग, पायऱ्या यांसारख्या इमारतीच्या दर्शनी भागासाठी उपयुक्त उत्पादने आणि ग्लासफायबर प्रबलित काँक्रीटची रचना, अभियांत्रिकी आणि ते स्थापित करण्याच्या क्षेत्रातील ॲस्थेटिक इंजिनीयरिंग लिमिटेडने गुरुवार, ८ ऑगस्टपासून ते १२ ऑगस्टपर्यंत प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) प्रस्तावित केला आहे.

लघू व मध्यम उद्योगांसाठी स्थापित ‘एनएसई इमर्ज’ या बाजारमंचावर समभागांच्या सूचिबद्धतेसाठी या आयपीओतून ॲस्थेटिक इंजिनीयर्सला २६.४७ कोटी रुपये उभारले जाणे अपेक्षित आहे. यासाठी गुंतवणूकदारांना प्रत्येकी ५५ रुपये ते ५८ रुपये किमतीला कंपनीच्या किमान २००० समभागांसाठी अर्ज दाखल करावा लागेल. नारनोलिया फायनान्शियल सर्व्हिसेस या कंपनीकडून आयपीओचे व्यवस्थापन पाहिले जात आहे. भागविक्रीतून मिळणारा निधी कंपनीच्या आदरातिथ्य, निवासी तसेच वाणिज्य आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांतील खेळत्या भांडवलाची गरज म्हणून वापरात येणार आहे.

Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
10th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१० सप्टेंबर पंचांग: अनुराधा नक्षत्रात सुखाने भरेल तुमची झोळी! प्रिय व्यक्तीची भेट तर व्यापारात होईल मोठा फायदा; वाचा तुमचे भविष्य
Sachin Tendulkar Firstcry IPO profit
FirstCry IPO: फस्टक्राय IPO मधून सचिन तेंडुलकर आणि इतरांनी कमवले बक्कळ पैसे; वाचा किती झाला नफा?
constable commits suicide marathi news
पुणे: महिला पोलीस शिपायाची इंद्रायणी नदीत उडी; तरुणाने वाचवण्याचा प्रयत्न केला पण…
Manu Bhaker's Father Statement on His Daughter and Neeraj Chopra Marriage Rumors
Manu Bhaker Neeraj Chopra: मनू भाकेर-नीरज चोप्राची सोयरीक जुळली? मनूच्या वडिलांनी केले मोठे वक्तव्य; म्हणाले, “नीरजला आम्ही…”
What Supriya Sule Said About Ajit Pawar ?
Supriya Sule : ‘अजित पवारांना राखी बांधणार का?’ विचारताच सुप्रिया सुळे हसल्या आणि म्हणाल्या, “मी आज..”
IPO of Forcas Studio Limited from August 19
फोर्कास स्टुडिओ लिमिटेडचा १९ ऑगस्टपासून ‘आयपीओ’
Vinesh Phogat net worth
Vinesh Phogat : रौप्यपदकाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या विनेश फोगटची एकूण संपत्ती किती आहे माहितेय का? जाणून घ्या

हेही वाचा >>> परदेशी गुंतवणूकदारांचा ‘आयटी’ समभागांकडे कल; जुलैमध्ये ११,७६३ कोटींची आजवरची सर्वोच्च गुंतवणूक

पॉझिट्रॉन एनर्जी भागविक्रीतून ५१.२१ कोटी उभारणार!

 नैसर्गिक वायूचे संग्रहण आणि वितरण तसेच तेल व वायू क्षेत्रासाठी व्यवस्थापन व तांत्रिक सल्लागार सेवा प्रदान करणाऱ्या पॉझिट्रॉन एनर्जी लिमिटेडने भांडवली बाजारात खुल्या समभाग विक्रीतून (आयपीओ) ५१.२१ कोटी रुपये उभारण्याचे प्रस्तावित केले आहे.

लघू व मध्यम उद्योगांसाठी स्थापित ‘एनएसई इमर्ज’ या बाजारमंचावर समभागांच्या सूचिबद्धतेसाठी पॉझिट्रॉन एनर्जीचा हा आयपीओ येत्या १२ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट दरम्यान खुला राहील. वैयक्तिक गुंतवणूकदारांना प्रत्येकी २३८ रुपये ते २५० रुपये या किमतीदरम्यान किमान ६०० समभागांसाठी बोली लावणारा अर्ज दाखल करावा लागेल. बीलाईन कॅपिटल ॲडव्हायजर्स ही या आयपीओचे व्यवस्थापन पाहत आहे. भागविक्रीतून मिळणारा निधी कंपनीकडून पूर्णपणे खेळत्या भांडवलाची गरज भागवण्यासाठी केला जाणार आहे.