Premium

आरबीआयच्या कारवाईनंतर पेटीएमने उचलले मोठे पाऊल, छोट्या कर्जावर होणार कपात, शेअर २० टक्क्यांनी घसरला

पेटीएमचा विश्वास आहे की, कंपनीच्या कमाईवर आणि मार्जिनवर फारसा परिणाम होणार नाही, कारण ५० हजार रुपयांपेक्षा जास्त कर्जामध्ये भरपूर क्षमता आहे.

paytm share price
RBI ने पेटीएम पेमेंट्स बँकेवर घातली बंदी, २९ फेब्रुवारीपासून बँक कोणत्याही ठेवी स्वीकारणार नाही (Image Credit- Financial Express)

रिझर्व्ह बँकेने वैयक्तिक कर्जाचे नियम कडक केल्यानंतर पेटीएमने छोट्या वैयक्तिक कर्जाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पेटीएम आता ५० हजार रुपयांपेक्षा वैयक्तिक कर्जाची संख्या कमी करणार आहे. कंपनीने बुधवारी ही माहिती दिली. विशेष म्हणजे आरबीआयच्या कारवाईनंतर पेटीएमच्या छोट्या कर्जाच्या संख्येत ५० टक्क्यांपर्यंत मोठी कपात दिसून येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

”पेटीएमवर कोणताही मोठा परिणाम होणार नाही”

पेटीएमचा विश्वास आहे की, कंपनीच्या कमाईवर आणि मार्जिनवर फारसा परिणाम होणार नाही, कारण ५० हजार रुपयांपेक्षा जास्त कर्जामध्ये भरपूर क्षमता आहे. अलीकडेच भारतीय रिझर्व्ह बँकेने वैयक्तिक कर्जाशी संबंधित नियम कडक केले आहेत. RBI ने लहान कर्जाचे जोखीम वजन २५ टक्क्यांनी वाढवले ​​आहे आणि ते १०० टक्क्यांवरून १२५ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. सेंट्रल बँकेच्या या निर्णयानंतर वैयक्तिक कर्ज महाग होणार असून, पेटीएमसारख्या कंपन्यांना असुरक्षित वैयक्तिक कर्जाची संख्या कमी करणे भाग पडले आहे.

हेही वाचाः Money Mantra : तुमचे बंद असलेले पोस्ट ऑफिस बचत खाते कसे सुरू करायचे? पद्धत जाणून घ्या

आधी पेटीएमचे शेअर्स तेजीत होते

पेटीएमने छोट्या रकमेच्या असुरक्षित वैयक्तिक कर्जांची संख्या कमी करण्याच्या निर्णयानंतर गुरुवारी शेअर बाजारात कंपनीच्या समभागांना मोठा फटका बसला. डिजिटल पेमेंट फर्म Paytm ची मूळ कंपनी One97 Communications चे शेअर्स ७ डिसेंबर रोजी २० टक्क्यांनी घसरले. यानंतर सकाळी ९.२३ वाजता लोअर सर्किट लागू झाले.

हेही वाचाः Money Mantra : आधारपासून ते डीमॅटपर्यंत अन् बँक लॉकरपासून ते एफडीपर्यंत ही सर्व कामे डिसेंबरमध्ये पूर्ण कराच अन्यथा…

कंपनीच्या उत्पन्नावर परिणाम होणार

ब्रोकरेज फर्म जेफरीजने सांगितले की, आरबीआयच्या छोट्या वैयक्तिक कर्जाचे नियम कडक करण्याच्या निर्णयानंतर पेटीएमच्या बाय नाऊ पे लेटर व्यवसायावर थेट परिणाम होणार आहे. कंपनीने जारी केलेल्या कर्जांमध्ये लहान वैयक्तिक कर्जाचा वाटा ५५ टक्के आहे. यामध्ये कंपनी पुढील ३ ते ४ महिन्यांत ५० टक्क्यांपर्यंत कपात करेल. जेफरीजने कंपनीच्या महसूल अंदाजात ३ ते १० टक्के कपात केली आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: After rbi action paytm big step reduction in small loans shares fell by 20 percent vrd

First published on: 07-12-2023 at 19:47 IST
Next Story
देशात १,१४,९०२ नोंदणीकृत नवउद्यमी उपक्रम