scorecardresearch

Premium

एअरबसचा महिंद्रा एरोस्पेससह चार कंपन्यांशी करार

युरोपमधील विमान निर्मिती कंपनी एअरबसने भारतातील चार कंपन्यांशी विमानांच्या सुट्या भागांच्या उत्पादनासाठी करार केले आहेत.

Airbus signs deal with four companies including Mahindra Aerospace
विमानांच्या सुट्या भागांची स्वेदशात निर्मितीसाठी पाऊल (फोटो- संग्रहित छायाचित्र)

मुंबई : युरोपमधील विमान निर्मिती कंपनी एअरबसने भारतातील चार कंपन्यांशी विमानांच्या सुट्या भागांच्या उत्पादनासाठी करार केले आहेत. त्यात महिंद्रा एरोस्पेससह एकस, डायनामॅटिक टेक्नॉलॉजीज आणि गार्डनर एरोस्पेस या कंपन्यांच्या समावेश आहे.

भारतातील चार कंपन्यांशी ‘मेक इन इंडिया’ उद्दिष्टाला साजेसा करार करण्यात आल्याची घोषणा एअरबसने सोमवारी केली. एअरबसच्या ए३२० निओ, ए ३३० निओ आणि ए ३५० या प्रकारच्या विमानांच्या सुट्या भागांचे उत्पादन या कंपन्या करणार आहेत. या कंपन्यांकडून एअरबसला विमानाच्या बाह्य भाग आणि पंख्याचे भाग यांचा पुरवठा होणार आहे. एअरबसने या आधीच वर्षाच्या सुरुवातीला, ए ३२० निओ प्रकारच्या विमानांच्या दरवाजाच्या उत्पादनासाठी टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टीम्स कंपनीशी करार केला आहे.

Tata Airlines Air India unique offer
टाटा एअरलाइन्सची अनोखी ऑफर; चेक इन बॅगेजशिवाय प्रवास केल्यास मिळणार जबरदस्त सवलत
sebi summons many former directors in financial irregularities in zee
‘झी’मधील आर्थिक गैरव्यवहारांच्या चौकशीचा विस्तार;‘सेबी’कडून कंपनीच्या अनेक माजी संचालकांना समन्स
The combined market capitalization of the Tata group of companies crosses the Rs 30 lakh crore mark
टाटा समूह शेअर बाजारात ‘नंबर वन’; गाठला ३० लाख कोटींचा टप्पा
indian share market
विश्लेषणः भारतीय शेअर बाजारात परदेशी गुंतवणूकदार कशा पद्धतीनं करतात गुंतवणूक? वाचा सविस्तर

आणखी वाचा-विकासदर ६.२ टक्के राहील; ‘फिच’चा सुधारीत अंदाज

एअरबस कंपनी भारतातून दरवर्षी ७५ कोटी डॉलरची सुट्या भागांची खरेदी आणि सेवा घेते. आता झालेल्या नवीन करारांमुळे यात मोठी भर पडणार आहे. सध्या एअरबस कंपनीमुळे भारतात १० हजार रोजगारांना पाठबळ मिळत आहे. आता ही संख्या १५ हजारांवर जाण्याची शक्यता आहे.

एअरबसच्या धोरणातील मुख्य भाग हा ‘मेक इन इंडिया’शी जुळवून घेण्याचा आहे. भारतातील एकात्मिक औद्योगिक वातावरणाला गती देण्यास आमचा हातभार लागत आहे, याबद्दल आम्हाला अभिमान आहे. यातून भारत विमान उत्पादन करणाऱ्या देशांमध्ये आघाडीवर जाईल. -रेमी मैलार्ड, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एअरबस इंडिया

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Airbus signs deal with four companies including mahindra aerospace print eco news mrj

First published on: 07-11-2023 at 12:29 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×