Bank Holiday in February 2024: वर्षाचा पहिला महिना लवकरच संपणार असून, फेब्रुवारी सुरू होणार आहे. त्यामुळे तुम्हाला पुढील महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण करायचे असेल, तर फेब्रुवारीमधील सुट्ट्यांची यादी आताच तपासून घ्या. शनिवार-रविवारच्या सुट्ट्यांव्यतिरिक्त फेब्रुवारीमध्ये वसंत पंचमी, छत्रपती शिवाजी जयंती आदींनिमित्त अनेक दिवस बँका बंद राहणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फेब्रुवारीमध्ये ११ दिवस बँका बंद राहणार

फेब्रुवारीच्या २९ दिवसांपैकी ११ दिवस बँकांना सुट्ट्या राहणार आहेत. यात शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचा समावेश आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया महिना सुरू होण्यापूर्वी सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करते, जेणेकरून ग्राहकांना कोणत्याही गैरसोयीला सामोरे जावे लागू नये. बँक ही एक आवश्यक वित्तीय संस्था आहे. त्यामुळे दीर्घ सुट्टी असताना अनेक महत्त्वाची कामे रखडतात. जर तुम्हाला बँकेतील कोणतेही महत्त्वाचे काम फेब्रुवारीमध्ये पूर्ण करायचे असेल, तर बँकेच्या सुट्ट्यांची यादी नक्कीच पाहा.

हेही वाचाः देशाला मिळाला पहिला एआय युनिकॉर्न, ‘कृत्रिम’ला ५ कोटी डॉलर्सचा निधी, बाजार मूल्य एक अब्ज डॉलर्सवर पोहोचले

फेब्रुवारी २०२४ मध्ये ‘या’ दिवशी बँका बंद राहणार

४ फेब्रुवारी २०२४ – रविवारमुळे देशभरात बँका बंद राहणार आहेत.
१० फेब्रुवारी २०२४ – महिन्याच्या दुसऱ्या शनिवारमुळे देशभरातील बँकांना सुट्टी असेल.
११ फेब्रुवारी २०२४ – रविवारमुळे संपूर्ण देशात बँका बंद राहतील.
१४ फेब्रुवारी २०२४ – वसंत पंचमी किंवा सरस्वती पूजेमुळे आगरतळा, भुवनेश्वर, कोलकाता येथे बँका बंद राहतील.
१५ फेब्रुवारी २०२४ – Lui-Ngai-Niमुळे इन्फाळमधील बँकांना सुट्टी असेल.
१८ फेब्रुवारी २०२४ – रविवार असल्यामुळे संपूर्ण देशात सुट्टी असेल.
१९ फेब्रुवारी २०२४ – छत्रपती शिवाजी जयंतीनिमित्त मुंबईत बँका बंद राहतील.
२० फेब्रुवारी २०२४ – राज्य दिनानिमित्त आयझॉल आणि इटानगरमध्ये बँका बंद राहतील.
२४ फेब्रुवारी २०२४ – दुसऱ्या शनिवारमुळे देशभरात बँका बंद राहतील.
२५ फेब्रुवारी २०२४ – रविवारमुळे देशभरातील बँका बंद राहतील.
२६ फेब्रुवारी २०२४ – Nyokum मुळे इटानगरमधील बँकांना सुट्टी असेल.

हेही वाचाः एलॉन मस्कला मागे टाकत ही व्यक्ती बनली जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, संपत्ती किती वाढली?

बँक बंद असताना तुमचे काम कसे पूर्ण करायचे?

बँकांना असलेल्या दीर्घ सुट्ट्यांमुळे अनेक वेळा महत्त्वाची कामे रखडतात. त्यातील नवीन तंत्रज्ञानामुळे ग्राहकांची अनेक कामे सुलभ झाली आहेत. तुम्ही घरबसल्या नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग किंवा UPI द्वारे एका बँक खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकता. पैसे काढण्यासाठी तुम्ही एटीएम वापरू शकता.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bank holiday in february 2024 banks are on holidays in february how many days will banks be closed vrd
First published on: 28-01-2024 at 13:30 IST