scorecardresearch

Premium

बार्कलेज बँक २००० कर्मचाऱ्यांना काढणार; भारतीय कर्मचाऱ्यांवरही परिणाम होणार का?

बार्कलेज बँकेत मोठ्या प्रमाणावर नोकर कपातीच्या बातम्या येत होत्या. भारतात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर याचा परिणाम होईल का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

Barclays Bank
(फोटो क्रेडिट- रॉयटर्स)

Barclays Bank Layoffs: यूकेची बहुराष्ट्रीय बार्कलेज बँक मोठ्या नोकर कपातीची तयारी करीत आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, १ अब्ज पौंड किंवा १.२५ अब्ज डॉलर्सच्या खर्चात कपात करण्यासाठी किमान २ हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकले जाऊ शकते. बार्कलेज बँक ही जगातील १० वी सर्वात मोठी बँक आहे आणि तिच्याकडे ८१,००० पेक्षा जास्त कर्मचारी आहेत. बँकेची स्थापना ३३३ वर्षांपूर्वी १६९० मध्ये झाली.

भारतीय कर्मचाऱ्यांवर परिणाम होणार का?

बार्कलेज बँकेत मोठ्या प्रमाणावर नोकर कपातीच्या बातम्या येत होत्या. भारतात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर याचा परिणाम होईल का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, बार्कलेज बँकेच्या या नोकर कपातीचा परिणाम प्रामुख्याने ब्रिटिश बँकेच्या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार आहे. बँकेचे व्यवस्थापक आढावा घेण्याच्या कामात व्यस्त असून, कंपनीने आपली योजना पुढे रेटल्यास किमान १५०० ते २००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात.

Traffic congestion Bhayander
भाईंदर : बोर्डाच्या परीक्षेच्या तोंडावर वाहतूक कोंडीचा त्रास, जागोजागी सुरु असलेल्या खोदकामामुळे नागरिक त्रस्त
AI killing tech jobs
AI मुळे नोकऱ्या जाणार की वाढणार? आयबीएम इंडियाचे प्रमुख काय म्हणतात नक्की वाचा!
Tata Punch Camo Edition Discontinued
अर्रर्र… टाटाचा ग्राहकांना धक्का! सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या एसयूव्हीचे १० व्हेरिएंट केले अचानक बंद, कारण काय?
job cuts in indian airlines spicejet to lay off 1000 employees
भारतीय विमान कंपनीतही नोकरकपातीचे वारे; ‘स्पाईसजेट’कडून हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड 

हेही वाचाः Black Friday sale : ऑनलाइन शॉपिंगमध्ये ‘या’ टिप्स वापरा, फसवणुकीपासून होणार सुटका

१ अब्ज पौंडांनी खर्च कमी करण्याचे लक्ष्य

बार्कलेजचे सीईओ सीएस वेंकटकृष्णन (C. S. Venkatakrishnan)  यांनी सांगितले की, बँक येत्या काही दिवसांत एकूण अब्जावधी पौंडांच्या खर्चात कपात करण्याचा विचार करीत आहे. या कपातीचा सर्वाधिक परिणाम बार्कलेज एक्झिक्युशन सर्व्हिसेसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार आहे, ज्यांना BX म्हणून ओळखले जाते.

हेही वाचाः Black Friday sale: विजय सेल्सपासून ते क्रोमापर्यंत ब्लॅक फ्रायडे सेलला सुरुवात, स्मार्टफोन अन् लॅपटॉपवर जबरदस्त सवलत

रॉयटर्सच्या बातम्यांनुसार, बार्कलेज दीर्घकालीन किरकोळ आणि गुंतवणुकीच्या खर्चात कपात करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी नोकर कपातीचा पर्यायही अवलंबला जात आहे. याबरोबरच बँकेने कर्मचाऱ्यांच्या बोनसमध्येही कपात केली आहे. या नोकर कपातीद्वारे बँकेला आपला खर्च ते उत्पन्न गुणोत्तर सुधारायचे आहे आणि हे सीईओ सीएस वेंकटकृष्णन यांच्या प्रमुख प्राधान्यांपैकी एक आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Barclays bank to cut 2000 jobs will indian employees also be affected vrd

First published on: 24-11-2023 at 11:52 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×