scorecardresearch

Premium

HDFC बँकेच्या ग्राहकांना मोठा धक्का, कर्जाचे व्याजदर महागले, किती EMI वाढणार?

HDFC बँकेने बेंचमार्क मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (MCLR) दर १५ बेसिस पॉइंट्स किंवा ०.१५ टक्क्यांनी वाढवले ​​आहेत. हे वाढलेले दर ७ सप्टेंबरपासून लागू करण्यात आले आहेत.

hdfc bank
देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकेचे कर्ज महागले, EMI वाढणार (फोटो क्रेडिट : फायनान्शिअल एक्स्प्रेस)

HDFC Bank Hikes MCLR : देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांसाठी कर्जे महाग केली आहेत. ७ सप्टेंबरपासून बँकेच्या ग्राहकांना HDFC बँकेच्या काही निवडक कर्जांवर जास्त व्याज द्यावे लागत आहे. HDFC बँकेने बेंचमार्क मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (MCLR) दर १५ बेसिस पॉइंट्स किंवा ०.१५ टक्क्यांनी वाढवले ​​आहेत. हे वाढलेले दर ७ सप्टेंबरपासून लागू करण्यात आले आहेत, म्हणजेच ग्राहकांचा EMI महागणार आहे. आता ग्राहकांना एचडीएफसी होम लोन, कार लोन, पर्सनल लोन इत्यादींवर जास्त खर्च करावा लागणार आहे.

HDFC बँकेचा नवे MCLR काय आहे?

HDFC बँकेच्या ओव्हरनाइट MCLR मध्ये १५ बीपीएसच्या वाढीनंतर तो ८.३५ टक्क्यांवरून ८.५० टक्के झाला आहे. एका महिन्याचा MCLR ०.१० टक्क्यांनी वाढला असून, तो ८.४५ टक्क्यांवरून ८.५५ टक्क्यांवर पोहोचला आहे. तीन महिन्यांचा MCLR ८.७० टक्क्यांवरून ८.८० टक्क्यांनी १० बेसिस पॉईंटने वाढला आहे. सहा महिन्यांचा MCLR १० बेसिस पॉईंटने वाढला आहे आणि ८.९५ टक्क्यांवरून ९.०५ टक्क्यांवर आला आहे.

Google Pixel 7 Discount
Google च्या ‘या’ नव्याकोऱ्या स्मार्टफोनचे १५ हजारात व्हा मालक; ‘इथे’ मिळतोय डिस्काउंट…
inmate escaping from Sassoon Hospital
पुणे : ‘ससून’मध्ये अनागोंदी कारभार! विभागीय आयुक्त झाडाझडती घेणार
Tata Consultancy Services (TCS)
TCS मध्ये वर्क फ्रॉम होम संपुष्टात? १ ऑक्टोबरपासून कर्मचाऱ्यांना आठवड्यातून ५ दिवस कार्यालयात जावे लागणार
28% gst on online gaming
१ ऑक्टोबरपासून ऑनलाइन गेमिंग, कॅसिनो आणि हॉर्स रेसिंगवर २८ टक्के GST लावला जाणार : CBIC चेअरमन

हेही वाचाः ”मोदींनी ५० वर्षांचे काम ६ वर्षांत करून दाखवले”, जी २० परिषदेपूर्वीच जागतिक बँकेकडून भारताची प्रशंसा

तुमच्या कर्जाचा MCLR किती वाढला?

एका वर्षाच्या MCLR शी जोडलेल्या अनेक ग्राहक कर्जांसाठी MCLR ५ बेसिस पॉईंटने वाढवला आहे. तो ९.१० टक्क्यांवरून ९.१५ टक्के झाला आहे. याशिवाय बँकेने एक वर्ष आणि दोन वर्षांसाठी MCLR ०.०५ टक्क्यांनी वाढवला आहे आणि तो ९.२० टक्क्यांवरून ९.२५ टक्के झाला आहे.

हेही वाचाः आधार कार्ड अपडेटची तारीख पुन्हा वाढवली, आता तुम्ही ‘या’ तारखेपर्यंत लाभ घेऊ शकता

HDFC बँकेचे इतर दर

सुधारित आधार दर १६ जूनपासून लागू होणार असून, तो ९.२० टक्के करण्यात आला आहे. बेंचमार्क पीएलआर दर १७.७० टक्के केला आहे.

MCLR वाढल्याने कर्ज महाग का झाले?

MCLR किंवा मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट २०१६ मध्ये भारताच्या बँकिंग नियामक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने लॉन्च केला होता. MCLR आता क्रेडिट आणि गृहकर्ज प्रदान करण्यासाठी बँकांचे अंतर्गत बेंचमार्क म्हणून लागू केले आहे, ज्याला फ्लोटिंग व्याजदर प्रणाली देखील म्हटले जाऊ शकते. MCLR थेट घर खरेदीदारांनी घेतलेल्या गृहकर्ज ईएमआयशी निगडीत आहे. त्यामुळे एमसीएलआर वाढल्याने बँक कर्ज महाग झाले आणि एचडीएफसी बँकेनेही तेच केले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Big shock to hdfc bank customers loan interest rates are expensive how much emi will increase vrd

First published on: 11-09-2023 at 09:49 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×