Hassanal Bolkiah Car Collection: सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर अंबानी, अदानी आणि टाटा ही नावे समोर येतात. पण देशातच नव्हे तर जगात असे अनेक लोकं आहेत जे अमाप संपत्तीचे मालक आहेत. जेव्हा सर्वात मोठ्या कार कलेक्शनचा विचार केला जातो तेव्हा ब्रुनेईच्या सुलतान हसनल बोलकिया यांचे नाव समोर येते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याच्याकडे जगातील सर्वात मोठे कार संग्रह आहे, ज्याचे मूल्य ५ अब्ज डॉलर्स (४००० कोटींहून अधिक) आहे. त्याच्या कलेक्शनमध्ये ७,००० हून अधिक गाड्या असल्याची माहिती आहे. ६०० रोल्स रॉयस आणि ३०० फेरारी! सुलतान बोलकियाच्या कार कलेक्शनमध्ये रोल्स-रॉयस, बेंटले, मर्सिडीज-बेंझ, फेरारी, लॅम्बोर्गिनी आणि पोर्श सारख्या मोठ्या ब्रँडच्या कारचा समावेश आहे. रिपोर्ट्सनुसार, सुलतान हसनल बोलकिया यांच्या मालकीच्या ७००० लक्झरी कारपैकी ६०० रोल्स रॉयस आणि ३०० फेरारी आहेत. विशेष म्हणजे, १९९० च्या दशकात विकल्या गेलेल्या सर्व रोल्स-रॉइस कारपैकी निम्म्या गाड्या बोलकिया कुटुंबाच्या मालकीच्या होत्या. काही रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की, हसनल बोलकिया लहान असताना ब्रुनेईच्या राजधानीत रात्री उशिरापर्यंत फेरारी रेस करत असत. (हे ही वाचा : Hyundai ची उडाली झोप! ६ एअरबॅग्जवाल्या ५ सीटर इलेक्ट्रिक SUV ची मागणी बाजारात थंडावली; विक्रीत घसरण ) युनायटेड किंगडमपासून देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हसनल बोलकिया हे १९८४ पासून ब्रुनेईचे सुलतान आणि पंतप्रधान म्हणून काम करत आहेत. राणी एलिझाबेथ २ नंतर इतिहासातील सर्वात जास्त काळ राज्य करणारा तो राजा आहे. तो आलिशान जीवनशैली जगतो. विलासी जीवनासाठी बोलकियांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले आहे. रिपोर्ट्सनुसार, सुलतानचे निवासस्थान (इस्ताना नुरुल इमान पॅलेस) १९८४ मध्ये बांधले गेले होते, जो २ दशलक्ष स्क्वेअर फूट क्षेत्रात पसरलेला जगातील सर्वात मोठा पॅलेस आहे. राजवाड्याचा घुमट २२ कॅरेट सोन्याने सजवला आहे, ज्याची किंमत २५५० कोटी रुपये आहे, अशी माहिती मीडिया रिपोर्ट्समधून समोर आली आहे.