Premium

Business Idea : आता रस्त्यालगत जमीन असल्यास उघडता येणार पेट्रोल पंप, भरघोस कमाईची संधी, जाणून घ्या प्रक्रिया

How To Open Petrol Pump : आजकाल पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या मागणीमुळे प्रत्येक लहान-मोठ्या गावात आणि शहरात नवीन पेट्रोल पंप सुरू होत आहेत. म्हणजेच आता हा व्यवसाय सुरू करून तुम्हीसुद्धा भरपूर पैसे कमावू शकता.

petrol rate

How To Open Petrol Pump : देशात सर्वत्र पेट्रोल आणि डिझेलसारख्या इंधनांना नेहमीच मागणी असते. त्यामुळे जर तुम्हालाही नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही पेट्रोल पंप उघडू शकता. पेट्रोल पंपाच्या व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता फार कमी असते. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेल भाव गगनाला भिडत आहेत, कारण त्याला मागणीही तेवढीच जास्त आहे. आजकाल पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या मागणीमुळे प्रत्येक लहान-मोठ्या गावात आणि शहरात नवीन पेट्रोल पंप सुरू होत आहेत. म्हणजेच आता हा व्यवसाय सुरू करून तुम्हीसुद्धा भरपूर पैसे कमावू शकता. पेट्रोल पंप उघडण्यासाठी तुमच्याकडे कोणत्याही मुख्य रस्त्यावर किमान ८०० चौरस मीटर जागा असणे आवश्यक आहे. पेट्रोल पंप उघडण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल ते आपण जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पेट्रोल पंप उघडण्यासाठी तुमचे इतके वय हवे

जर तुम्हाला पेट्रोल पंप उघडायचा असेल तर त्यासाठी पात्रता निकषानुसार तुमचे वय किमान २१ वर्षे असणे आवश्यक आहे. तसेच पेट्रोल पंपासाठी अर्ज करणाऱ्याने मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण केलेली असावी. अर्जदाराला रिटेल आउटलेट, व्यवसाय किंवा इतर संबंधित क्षेत्र चालवण्याचा किमान ३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे अर्जदाराचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नसावा.

हेही वाचाः सिस्टीम अपग्रेडमुळे ‘या’ बँकेच्या सेवा दोन दिवस बंद राहणार, जाणून घ्या वेळ अन् तारीख

या गोष्टी आवश्यक असतील

पेट्रोल पंप उघडण्यासाठी कोणत्याही मुख्य रस्त्यावर तुमच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे. तुम्ही एक डिस्पेंसिंग युनिट बसवल्यास ८०० स्क्वेअर मीटर आणि दोन डिस्पेंसिंग युनिट्ससाठी १२०० स्क्वेअर मीटर जमीन लागते. तसेच ही जमीन कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर वादांपासून मुक्त असावी.

हेही वाचाः विश्लेषण : जीडीपी वाढीनं भारत महासत्तेच्या मार्गावर अन् पाकची अर्थव्यवस्था दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर; स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर काय बदलले?

पेट्रोल पंप व्यवसायातील खर्च आणि कमाई

जरी पेट्रोल पंप उघडण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला खूप पैसे गुंतवावे लागत असले तरी एकदा तुम्ही कमाई सुरू केल्यानंतर ते वसूल करू शकता. एकदा तुम्ही पेट्रोल पंप सुरू केल्यानंतर तुम्हाला किमान ८-१० लाख रुपये गुंतवावे लागतील. जेव्हा तुमच्या पेट्रोल पंपावर इंधनाची विक्री सुरू होते, तेव्हा तुम्ही त्याच्या कमाईसह दरवर्षी तितकीच रक्कम सहज वाचवू शकता.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Business idea if there is land adjacent to the main road you can open a petrol pump know what is the process vrd