नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेने विविध कालावधीच्या निधीवर आधारित कर्ज व्याजदरात (एमसीएलआर) ५ आधारबिंदूंनी (०.०५ टक्के) वाढीची घोषणा शुक्रवारी केली. नवीन दरवाढ १२ ऑगस्टपासून लागू करण्यात येणार आहे. यातून, बँकेच्या गृह, वाहन, वैयक्तिक अशा सर्व ग्राहक कर्जदारांवरील हप्त्यांचा भार वाढणार आहे. रिझर्व्ह बँकेने गुरुवारी पतधोरण जाहीर करत रेपो दरात कोणतीही वाढ केली नाही. मात्र पतधोरणाचा दुसऱ्याच दिवशी कॅनरा बँकेने कर्जाच्या दरात वाढ केली आहे.

हेही वाचा >>> निर्मिती उद्योगातील ‘एफडीआय’ दशकभरात ६९ टक्के वाढ

lic stake in 282 companies which market value jumped over rs 15 lakh cror
‘एलआयसी’चे भाग गुंतवणुकीचे मूल्य १५ लाख कोटींपुढे; सव्वा तीन वर्षात दुपटीहून अधिक वाढ
SYMBIOSEXUAL
तुम्ही सुद्धा ‘Symbiosexual’ आहात का? ही नवीन लैंगिक ओळख नेमकी काय आहे? इंटरनेटवर याची इतकी चर्चा का?
fdi in manufacturing industry increased by 69 percent over a decade
निर्मिती उद्योगातील ‘एफडीआय’ दशकभरात ६९ टक्के वाढ
hindenburg research post on india
Hindenburg Research : भारतात लवकरच काहीतरी मोठं घडणार? हिंडेनबर्ग रिसर्चच्या ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण!
govt introduce banking reforms bill in lok sabha four nominees allow to a bank
बँक खात्याला चौघांचे नामनिर्देशन शक्य; लोकसभेत बँकिंग सुधारणा विधेयक सादर
Toyota Innova Hycross Bookings Open
मायलेज २४ किमी, तुफान मागणीमुळे कंपनीने बुकिंग बंद केलेल्या ‘या’ ८ सीटर कारचे २ महिन्यानंतर बुकिंग पुन्हा सुरु, किंमत…
Who is Madhabi Puri Buch
Madhabi Puri Buch : हिंडेनबर्गच्या अहवालामुळे चर्चेत आलेल्या माधबी पुरी बुच कोण? मुंबईत घेतलंय प्राथमिक शिक्षण, तर चीनच्या बँकेतही होत्या सल्लागार!
PM Narendra Modi Italy Visit
Unified Pension Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; नव्या पेन्शन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी!

आता इतर बँकांकडून देखील कर्जाच्या दरात वाढ केली जाण्याची शक्यता आहे. सर्वसाधारणपणे ‘एमसीएलआर’चे दर एक ते तीन वर्षांसाठी निश्चित करण्यात आलेले असतात. ‘एमसीएलआर’वर आधारित एक वर्ष मुदतीच्या कर्जावरील कॅनरा बँकेचे व्याजदर ०.५ टक्क्यांनी वाढून ९ टक्क्यांवर नेण्यात येईल. याचप्रमाणे दोन आणि तीन वर्षे मुदतीच्या कर्जासाठी दर आता अनुक्रमे ९.३० टक्के आणि ९.४० करण्यात येणार आहे. एक महिना, तीन महिने आणि सहा महिन्यांच्या कालावधीचा दर ८.३५ टक्के ते ८.८० टक्क्यांदरम्यान असेल. एका दिवसासाठी तो ८.२० टक्के असेल.