scorecardresearch

Premium

नागरी सहकारी बँकांच्या अडचणींचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारकडून समिती स्थापन

राज्यात ४३५ नागरी सहकारी बँका असून करोना नंतर या बँकांना व्यवसाय करताना अनेक अडचणी येत आहेत.

Committee set up state government study problems civic cooperative banks
नागरी सहकारी बँकांच्या अडचणींचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारकडून समिती स्थापन (संग्रहित छायाचित्र)

मुंबई: राज्यातील नागरी सहकारी बँकांना येत असलेल्या अडचणींचा अभ्यास करुन त्यांना सरकारकडून कोणती मदत करता येईल, याबाबत अहवाल देण्यासाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे.

राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या या समितीमध्ये सावंतवाडी नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष सुभाष पणदूरकर, बृहन्मुंबई नागरी सहकारी बँक असोसिएशनचे संचालक सी. बी. अडसूळ, उपनिबंधक आनंद कटके, मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक नितीन बनकर यांचा समावेश आहे. महाराष्ट्र नागरी सहकारी बँक्स फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सायली भोईर या सदस्य सचिव असतील.

dharavi redevelopment project pvt ltd marathi news, dharavi business owners marathi news
धारावी पुनर्विकासात व्यावसायिकांना आता जीएसटी सवलतीचे गाजर…पण पुनर्विकास कोठे होणार याबाबत मौन!
unique information, exhibition hall, State Excise Department
१८३९ नंतर मद्यपान करण्यासाठी १८ वर्षे वयोमर्यादा जगभरात लागू! नव्या राज्य उत्पादन शुल्क भवनातील खास दालनातील माहिती
thane heavy traffic jam asha volunteers demands eknath shinde protest morcha
ठाण्यात आशा स्वयंसेविकांच्या मोर्चामुळे वाहतूक कोंडी
Eknath Shinde Abhishek Ghosalkar
अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडवर, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा निर्णय

हेही वाचा… यंदा २ डिसेंबरपर्यंत दाखल प्राप्तिकर विवरणपत्रे आठ कोटींवर

राज्यात ४३५ नागरी सहकारी बँका असून करोना नंतर या बँकांना व्यवसाय करताना अनेक अडचणी येत आहेत. त्याबाबत चर्चा करण्यासाठी सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे १९ ऑक्टोबर रोजी बैठकही आयोजित करण्यात आली होती. या समस्यांमध्ये शासनाकडून काय निर्णय घेता येतील आणि त्याचा सहकारी बँकांना उपयोग होईल, या अनुशंगाने सरकारला अहवाल देण्यासाठी समिती नियुक्त करण्यात आली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Committee set up by the state government to study the problems of civic cooperative banks print eco news dvr

First published on: 05-12-2023 at 11:16 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×