scorecardresearch

Court Action on Railways : ‘या’ ट्रेनमध्ये एसी अन् पंखे चालत नव्हते, कोर्टाने रेल्वेला ठोठावला १५ हजारांचा दंड

TOI रिपोर्टनुसार, याचिकाकर्ते केव्हीएस अप्पा राव यांनी आरोप केला होता की, त्यांनी एसी आणि पंखे काम करत नसल्याबद्दल रेल्वे अधिकाऱ्यांना माहिती दिली होती.

Court Action on Railways
'या' एक्सप्रेसमध्ये एसी अन् पंखे चालत नव्हते, कोर्टाने रेल्वेला ठोठावला १५ हजारांचा दंड (प्रातिनिधिक छायाचित्र)

Fine on Railways : न्यायालयाने निष्काळजीपणासाठी रेल्वेला १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. गरीब रथ ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान एसी किंवा पंखे सुरू नसल्याची तक्रार एका प्रवाशाने केली होती. त्यामुळे डब्यात हवेचा तुटवडा निर्माण झाला होता. घुटमळणाऱ्या वातावरणात प्रवास करताना त्याला गैरसोय सहन करावी लागली. या प्रकरणी न्यायालयाने दक्षिण मध्य रेल्वेच्या विरोधात निकाल देत दंड ठोठावला.

माहिती देऊनही दिलासा मिळाला नाही

TOI रिपोर्टनुसार, याचिकाकर्ते केव्हीएस अप्पा राव यांनी आरोप केला होता की, त्यांनी एसी आणि पंखे काम करत नसल्याबद्दल रेल्वे अधिकाऱ्यांना माहिती दिली होती. नुकसानभरपाईसाठी पत्रही लिहिले होते. परंतु कारवाई झाली नाही. त्यावर जिल्हा ग्राहक मंचाने हे स्पष्टपणे निष्काळजीपणाचे आणि सेवांच्या अभावाचे प्रकरण असल्याचे सांगितले. दक्षिण मध्य रेल्वेला विजेचा प्रश्न सोडवता आला नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. त्यामुळे रेल्वेने याचिकाकर्त्याला १५ हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी.

nigerian citizen escaped from police custody, navi mumbai police raid, nigerian citizen arrested for drugs smuggling in navi mumbai
Video : नवी मुंबई पोलिसांची बेफिकरी आणि चपळता, दोन्हींचे उदाहरण एकाच वेळी….बघा नक्की काय घडलं
Weird Man Masturbates While Chasing Van Of Female Students On Bike Hides Face With Helmet Video Makes people Angry
तरुणींच्या गाडीचा बाईकवरून पाठलाग करत विकृत करत होता हस्तमैथुन! Video मध्ये कैद झाला गलिच्छ प्रकार
Case File in this Matter
मुंबईतल्या मराठी महिलेला ‘मराठी’ म्हणून हिणवत घर नाकारणाऱ्या पिता-पुत्रावर गुन्हा दाखल
Philippines News
नावाचा घोळ आणि भारतीय व्यावसायिकाला फिलिपाईन्समध्ये भोगावा लागला पाच वर्षांचा तुरुंगवास, धक्कादायक घटनाक्रम वाचाच!

राव आपल्या मुलीबरोबर प्रवास करत होते

अप्पा राव ५ एप्रिल २०२३ रोजी आपल्या मुलीसह विशाखापट्टणम ते सिकंदराबाद या प्रवासाला निघाले होते. गरीब रथ ट्रेनमध्ये त्यांनी दोन जागा बुक केल्या होत्या. राव यांच्या म्हणण्यानुसार, ट्रेन संध्याकाळी ८.४० वाजता निघाली आणि रात्रीचे जेवण करून ते १० वाजता झोपायला गेले. मात्र, रात्रीच्या वेळी एसी आणि पंखे बंद होते. त्यांनी याबाबत टीटीईला माहिती दिली असता त्यांनी एलुरु स्थानकावरील समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. पण ट्रेनमधील पंखे तिथे दुरुस्त करता आले नाहीत. मग विजयवाडा स्टेशनवर सकाळी ही समस्या सुटू शकली. तोपर्यंत सर्व प्रवाशांची अडचण सुरूच होती.

त्यांनी आरटीआयही दाखल केला

राव यांनी आरटीआयही दाखल केला होता. यातून त्यांना ट्रेनचे डिझेल जनरेटर काम करत नसल्याचे समोर आले. त्यामुळे एसी प्लांटचा वीजपुरवठा बंद झाला. यानंतर त्यांनी हैदराबादच्या जिल्हा ग्राहक न्यायालयात खटला दाखल करून दंडाची मागणी केली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Court action on railways ac and fans were not working in gareeb rath train the court fined the railways 15 thousand vrd

First published on: 21-11-2023 at 15:06 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×