पीटीआय, नवी दिल्ली

देशभरात मार्च महिन्यात ३ लाख २२ हजार ३४५ प्रवासी वाहनांची विक्री झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत विक्रीत ६ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. ग्राहकांनी वाहन खरेदी एप्रिल महिन्यातील शुभ मुहूर्तासाठी पुढे ढकलल्याने मार्चमध्ये विक्री कमी झाली.

Indian exports up 1 07 percent in april trade deficit at 4 month high
 व्यापार तूट ४ महिन्यांच्या उच्चांकी; एप्रिलमध्ये १९.१ अब्ज डॉलरवर
Record sales, vehicles
एप्रिलमध्ये वाहनांची विक्रमी विक्री
Rising Highway Accidents, Akola, 52 Accidents deaths in Three Months, 52 Accidents deaths in akola, accident deaths, accident news, akola news, marathi news,
अकोला : वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे अपघातांचे वाढते संकट, तीन महिन्यात ५२ बळी
The price of gold is increasing
सोन्याची किंमत दिवसेंदिवस वाढतीच; गुंतवणूकदारांनी काय करावे?
LIC first installment income from new customers hits 12 year high with Rs 12383 crore in April up 113 percent
एलआयसीचे नवीन ग्राहकांच्या पहिल्या हप्त्यापोटी उत्पन्न १२ वर्षांच्या उच्चांकी; एप्रिल महिन्यात १२,३८३ कोटींसह ११३ टक्के वाढ
उद्योगधंद्यांच्या कर्जात वाढ, तर मार्चमध्ये  वैयक्तिक कर्जात  घट; ‘केअरएज रेटिंग्ज’च्या अहवालात बँकिंग व्यवसायाबाबत आश्वासक चित्र
dombivli east marathi news, digging of busy roads
डोंबिवली पूर्वेतील वर्दळीचे रस्ते खोदल्याने नागरिक हैराण
Dilemma of onion growers for 14 months in last five years
गेल्या पाच वर्षांतील १४ महिने कांदा उत्पादकांची कोंडी

फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डिलर्स असोसिएशनने (एफएडीए) प्रवासी वाहन विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार, गेल्या वर्षी मार्च महिन्यात ३ लाख ४३ हजार प्रवासी वाहनांची विक्री झाली होती. त्यात यंदा मार्चमध्ये घट झाली. एप्रिल महिन्यात वाहन खरेदीसाठी गुढीपाडव्यासह अनेक शुभमुहूर्त आहेत. त्यामुळे ग्राहकांनी मार्चमधील वाहन खरेदी पुढे ढकलली. वाहनांचा साठा, उपलब्धता वाढण्यासोबत नवीन मॉडेल सादर होण्याचे प्रमाणही वाढले आहे. मार्चमध्ये प्रवासी वाहनांची विक्री कमी झाली असली तरी सरलेल्या आर्थिक वर्षात एकूण ३९ लाख ४८ हजार १४३ वाहनांची विक्री झाली आहे. त्याआधीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत त्यात ८.४५ टक्के वाढ झाली आहे.

याबाबत असोसिएशनचे अध्यक्ष मनीष राज सिंघानिया म्हणाले की, प्रवासी वाहनांची विक्री वाढण्यास त्यांची उपलब्धता आणि नव्याने सादर झालेली मॉडेल महत्त्वाची ठरली आहेत. एसयूव्हीची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या प्रवासी वाहनांमध्ये एसयूव्हीचे प्रमाण ५० टक्क्यांवर पोहोचले आहे.