लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
पुणे : देशात आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये जमिनीचे १०१ मोठे व्यवहार झाले. त्यात एकूण २ हजार ९८९ एकर जमिनीची विक्री झाली. सर्वाधिक व्यवहार देशातील प्रमुख सात महानगरांत झाले आहेत. जमिनीच्या व्यवहारांमध्ये दिल्लीने प्रथम क्रमांक पटकावला असून, मुंबई दुसऱ्या स्थानी आहे.

मालमत्ता क्षेत्रातील सल्लागार संस्था अनारॉक ग्रुपने सरलेल्या आर्थिक वर्षात देशात झालेल्या जमीन व्यवहारांचा अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार, गेल्या आर्थिक वर्षात १०१ मोठे जमीन व्यवहार झाले. त्यात २ हजार ९८९ एकर जमिनीची विक्री झाली. त्याआधीच्या आर्थिक वर्षात ८३ व्यवहार होऊन १ हजार ८८६ एकर जमिनीची विक्री झाली होती. त्या तुलनेत गेल्या वर्षी जमिनीची विक्री ५८ टक्के जास्त आहे. गृहनिर्माण बाजारपेठेत तेजीचे वातावरण असल्याने या प्रकल्पांसाठी प्रामुख्याने जमिनीचे व्यवहार झाले आहेत.

Loksatta editorial political party Speeches of political leaders criticizing each other
अग्रलेख: घंटागाडी बरी…
Competition among 7 companies under incentive scheme for ACC production
‘एसीसी’ उत्पादनासाठी प्रोत्साहन योजनेअंतर्गत ७ कंपन्यांमध्ये चढाओढ
students choose the US for overseas higher education
अग्रलेख : ‘आ’ आणि ‘उ’!
loksatta editorial pm narendra modi controversial statement on muslim community
­­­­अग्रलेख : पंतप्रधानांचे आभार माना!
RBI restrictions on Konark Urban Cooperative Bank
रिझर्व्ह बँकेचे कोणार्क अर्बन सहकारी बँकेवर निर्बंध
The Supreme Court asked the central government why it stopped the action against fraudulent advertisements
फसव्या जाहिरातींवरील कारवाई का रोखली? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल
Prajwal Revanna Karnataka Sex Scandal Case Marathi News
Karnataka Sex Scandal: “काहीजण स्वत:च्या पत्नीला विचारतायत की प्रज्वल रेवण्णाशी तुझा…”, जेडीएस नेत्यानं मांडली व्यथा; व्हिडीओतील महिला सोडतायत घरदार!
Harsh Goenka on Share market predict
‘शेअर मार्केटमध्ये हर्षद मेहताच्या युगाची पुनरावृत्ती’, बड्या उद्योगपतीने गुजराती-मारवडींचा उल्लेख करत वर्तविली भीती

हेही वाचा >>>म्युच्युअल फंडांचे नवीन १८५ योजनांद्वारे ६६,३६४ कोटींचे संकलन

देशातील प्रमुख सात महानगरांमध्ये ८३ व्यवहार झाले असून, त्यातून १ हजार १३५ एकर जमिनीची विक्री झाली आहे. त्यात दिल्ली ३१३ एकरच्या २९ व्यवहारांसह आघाडीवर आहे. मुंबई १५७ एकरच्या १९ व्यवहारांसह दुसऱ्या स्थानी आहे. बंगळुरू ४९० एकरच्या १४ व्यवहारांसह तिसऱ्या स्थानी आहे. महानगरांसोबत इतर शहरांमध्येही आता व्यवहार वाढू लागले आहेत. अहमदाबाद, अयोध्या, जयपूर, नागपूर, म्हैसूर, लुधियाना आणि सुरतमध्ये एकूण १८ व्यवहार झाले असून, त्यातून १ हजार ८५३ एकर जमिनीची विक्री झाली आहे.

क्षेत्रनिहाय व्यवहार ( आर्थिक वर्ष २०२३-२४)

क्षेत्र – जमीन (एकरमध्ये) – व्यवहार – शहरे

वाणिज्य – ३१ – ३ – गुरूग्राम, नोएडा, मुंबई

औद्योगिक – ३८ – १ – गुजरात

आयटी पार्क – ११ – २ – चेन्नई, नवी मुंबई</p>

लॉजिस्टिक पार्क – ११५ – २ – नागपूर, कटक

उत्पादन – ४११.७५ – ३ – बंगळुरू, गुजरात, आंध्र प्रदेश

संमिश्र वापर – ७९ – ४ – पुणे, मुंबई, लुधियाना

भूखंड विकास – ४८१.५ – ४ सोनिपत, नागपूर, सुरत, अहमदाबाद

निवासी – ६०६.१३ – ७० – पुणे, बंगळुरू, मुंबई, हैदराबाद, दिल्ली, चेन्नई, म्हैसूर, अयोध्या, जयपूर

रिटेल – ११ -१ – ठाणे</p>

टाऊनशिप – ११६४.३३ – ६ – अहमदाबाद, बंगळुरू, ठाणे, लुधियाना, गाझियाबाद

शैक्षणिक – ८.६१ – १ – गुरुग्राम

निर्णय न झालेले – ३१.५२ – ४ – कोलकाता, चेन्नई, कर्नाळा (महाराष्ट्र)