मुंबई : म्युच्युअल फंड, मुदत ठेव योजनांचे वितरण, स्थावर मालमत्ता दलाली, तांत्रिक सल्लामसलत अशा वैविध्यपूर्ण वित्तीय सेवा देणारे गुंतवणूक आणि वित्तीय सेवा मंच असलेल्या धारणी कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेडने प्रारंभिक समभाग विक्रीच्या (आयपीओ) माध्यमातून ५३,७०,००० समभाग विक्रीला खुले केले असून, त्यायोगे १०.७४ कोटी रुपयांची निधी उभारणी प्रस्तावित केली आहे.

हेही वाचा >>> बापरे ! तंत्रज्ञान क्षेत्रातून दररोज इतके लोक गमावतायत नोकऱ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई शेअर बाजाराच्या ‘बीएसई एसएमई मंचा’वर सूचिबद्धतेसाठी असलेली ही समभाग विक्री बुधवारी १८ जानेवारी ते २० जानेवारी या दरम्यान सुरू राहील. प्रति समभाग २० रुपये विक्री किंमत निश्चित करण्यात आली असून, किमान ६,००० समभागांसाठी वैयक्तिक गुंतवणूकदारांना अर्ज करता येईल. सृजन अल्फा कॅपिटल ॲडव्हायझर्स एलएलपी ही कंपनी भागविक्रीची व्यवस्थापन पाहात आहे. भागविक्रीतून मिळणारा निधी धारणी कॅपिटलकडून उपकंपन्यांमध्ये गुंतवला जाणार आहे.