Avenue Supermarts Stock Price : सुपरमार्केट चेन Avenue Supermart (D-Mart) चा IPO आणणे हे मार्केट गुरू आणि अनुभवी गुंतवणूकदार राधा किशन दमाणी यांच्यासाठी गेमचेंजर ठरले आहे. IPO मुळे त्यांच्या संपत्तीत लक्षणीय वाढ झाली आहे आणि ते भारतातील अव्वल अब्जाधीशांच्या यादीत सामील झाले आहेत. डी-मार्टने लिस्ट झाल्यापासून ११०० टक्के परतावा दिला आहे. शेअर बाजारात कंपनीची लिस्टिंग झाल्यापासून हा इश्यू किमतीपेक्षा १२ पट अधिक मजबूत झाला आहे. आज कंपनीचे बाजारमूल्य २.३३ लाख कोटींवर पोहोचले आहे. नुकत्याच झालेल्या सुधारणांनंतर शेअरचे मूल्यांकन पुन्हा एकदा आकर्षक झाले आहे. ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल यांनी यामध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. दमाणी ज्या शेअर्समुळे टॉप श्रीमंतांच्या यादीत सामील झाले, त्या शेअरबद्दल जाणून घेऊयात.

डी-मार्टचा स्टॉक वाढण्याची अपेक्षा?

ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल यांनी डी-मार्ट स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे आणि ४२०० रुपयांचे उच्च लक्ष्य आहे. तर सध्याची किंमत ३५४७ रुपये आहे. या संदर्भात आता गुंतवणूक केल्यास १८ टक्के किंवा प्रति शेअर ६५३ रुपये परतावा मिळणे अपेक्षित आहे. कंपनीचे समृद्ध मूल्यमापन असूनही उद्योगातील आघाडीची वाढ, मार्जिन आणि आरओसीई साध्य करण्यात सातत्याने स्थिरता दर्शविली आहे, असंही ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे.

uddhav thackeray slams narendra modi during in an interview with the indian express
मोफत धान्य देण्यापेक्षा रोजगार का देत नाही? ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांचा मोदींना सवाल
Elon Musk
टेस्लातील १० टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड, एलॉन मस्क यांनी मेलद्वारे दिला इशारा; म्हणाले, “खर्च कमी करण्यासाठी…”
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”

वाढत्या ऑनलाइन किराणा बाजाराबद्दल काळजी करण्याची गरज नाही, कारण एकूण किराणा बाजारात ऑनलाइन आणि आधुनिक रिटेलचा वाटा फारच कमी आहे आणि बाजारात संधी खूप मोठी आहे, असंही ब्रोकरेज हाऊसचं म्हणणं आहे. आर्थिक वर्ष २०२४ मधील SSSG मधील सुधारणेमुळे मूल्यमापन वाढेल. अशा परिस्थितीत ब्रोकर्सनी DMART साठी ४२०० रुपये टीपी निश्चित केला आहे. हे ब्रोकरेजच्या तीन टप्प्यावरील DCF मूल्यांकनाशी सुसंगत असून, ते दीर्घ मुदतीसाठी रोख प्रवाह निर्माण करते.

कंपनीसह सकारात्मक घटक

>> गेल्या काही वर्षांत मजबूत वाटचाल
>> बाजारातील स्पर्धात्मक स्थिती
>> ऑनलाइन व्यवसाय अन् रोख रकमेच्या बाबतीत चांगले तयार
>> वाढीसाठी चांगली सधी
>> निरोगी ताळेबंद आणि रोख प्रवाह

हेही वाचाः मदर डेअरीने ग्राहकांना दिला दिलासा, धारा ब्रँडच्या तेलाच्या दरात कपात, नवीन दर काय?

अव्हेन्यू सुपरमार्ट : दमाणी यांचे नशीब फळफळले

आर. के. दमानी यांनी ६ वर्षांपूर्वी मार्च २०१७ मध्ये एव्हेन्यू सुपरमार्टला शेअर बाजारात सूचीबद्ध करण्याची योजना आखली होती. स्टॉक एक्स्चेंजमध्ये २१ मार्च २०१७ रोजी सूचीबद्ध झाला होता. इश्यूसाठी शेअरची किंमत २९९ रुपये होती. त्याच वेळी शेअर बाजारात ६४२ रुपयांच्या किमतीसह म्हणजेच १०० टक्क्यांहून अधिक प्रीमियमसह बाजारात सूचीबद्ध झाला. आता तो ३५८६ रुपयांच्या पातळीवर आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांना सूचीबद्ध किमतीतून सुमारे ११०० टक्के परतावा मिळाला आहे. बाजारमूल्याच्या बाबतीत, एव्हेन्यू सुपरमार्ट ही बाजारपेठेतील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक आहे.

हेही वाचाः एचडीएफसी बँकेचे कर्ज महागले, तुमचा EMI आता वाढणार

IPO नंतर दमाणी यांच्या संपत्तीत वाढ झाली

जुलै २०१६ मध्ये आर. के. दमाणी यांची संपत्ती ९२८१ कोटी रुपये होती. जुलै २०१७ मध्ये दमाणी यांची संपत्ती २९७०० कोटी रुपयांवर गेली. फेब्रुवारी २०२० मध्ये त्यांची एकूण संपत्ती १.२७ लाख कोटी रुपये होती. तर आता त्यांची संपत्ती १.३८ लाख कोटी रुपये झाली आहे. उद्योगपती असण्याबरोबरच दमाणी हे शेअर बाजारात मोठे गुंतवणूकदारही आहेत. २००२ मध्ये त्यांनी डी-मार्टचे पहिले स्टोअर सुरू केले. सध्या दमाणी यांच्याकडे कंपनीत ६७.५ टक्के हिस्सा आहे, म्हणजे पोर्टफोलिओमध्ये ४३७,४४४,७२० शेअर्स आहेत, ज्यांचे सध्याचे मूल्य १५६,९११.४ कोटी आहे.