scorecardresearch

Premium

बायजूवर ईडीची धाड, ९ हजार कोटींचा घोटाळा पकडला

छाप्यादरम्यान ईडीला असेही आढळून आले की, २०११ ते २०२३ दरम्यान कंपनीला सुमारे २८ हजार कोटी रुपयांची थेट विदेशी गुंतवणूक (FDI) मिळाली आहे.

ED caught Byjus big scam 9000 crore
ईडीने बायजूचा मोठा घोटाळा पकडला, ९ हजार कोटींची अफरातफर उघड (फोटो क्रेडिट- फायनान्शिअल एक्सप्रेस)

मुलांना डिजिटल शिक्षण देणाऱ्या बायजू या कंपनीमध्ये एक मोठी अफरातफर आढळून आली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला ईडीने बायजूशी संबंधित कार्यालये आणि इतर परिसरांवर छापे टाकून झडती घेतली होती. कंपनीशी संबंधित अनेक कागदपत्रे आणि डिजिटल डेटाही जप्त करण्यात आला आहे. यानंतर तपासादरम्यान ईडीला बायजूने परकीय चलन कायदा (FEMA) संबंधित अनेक तरतुदींचे उल्लंघन केल्याचे आढळले आहे. हा गैरव्यवहार सुमारे ९ हजार कोटी रुपयांचा आहे. स्टार्टअप क्षेत्रातील कंपनी असल्याने बायजूला परदेशातून मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला आहे.

छाप्यादरम्यान ईडीला असेही आढळून आले की, २०११ ते २०२३ दरम्यान कंपनीला सुमारे २८ हजार कोटी रुपयांची थेट विदेशी गुंतवणूक (FDI) मिळाली आहे. या काळात कंपनीने थेट परदेशात गुंतवणुकीसाठी सुमारे ९,७५४ कोटी रुपये पाठवले. परदेशात पाठवलेल्या पैशांपैकी कंपनीने जाहिरात आणि मार्केटिंगच्या नावाखाली सुमारे ९४४ कोटी रुपये खर्च केले.

sassoon hospital medicine supply, no medicine supply to sassoon hospital from haffkine, payment of rupees 6 crores to haffkine
‘हाफकिन’ला सहा कोटी रुपये देऊनही ‘ससून’ला औषधपुरवठा नाही!…ससूनच्या अहवालातील धक्कादायक माहिती
tata group
TATA समूहाच्या ‘या’ १२ शेअर्सनी कमावला प्रचंड नफा, ६ महिन्यांत दिला १५० टक्क्यांपर्यंतचा परतावा
Fiscal deficit
वित्तीय तूट ऑगस्टअखेर ६.४३ लाख कोटींवर; पहिल्या पाच महिन्यांत वार्षिक अंदाजाच्या ३६ टक्क्यांवर
Central government, home loan, interest subsidy
गृहकर्ज व्याज अनुदानापोटी केंद्राची ६०,००० कोटींच्या खर्चाची योजना

हेही वाचाः टाटा समूहाच्या ‘या’ कंपनीत नोकरीची संधी, वेगवेगळ्या विभागात ३००० जणांची भरती करणार, जाणून घ्या

लेखापरीक्षण न केल्याचाही आरोप

त्याच्या गुंतवणूकदारांपासून ते अनेक मंडळ सदस्यांपर्यंत बायजूसच्या कार्यशैलीवर आधीच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. कंपनीने आपल्या पुस्तकांचे ऑडिट केलेले नसल्याचे आढळले आहे. सध्या २०२३-२४ आर्थिक वर्ष सुरू आहे, तर कंपनीने २०२०-२१ चे आर्थिक विवरण तयार केलेले नाही. तसेच मागील आर्थिक वर्षाचे आर्थिक निकाल देखील मोठ्या विलंबाने जाहीर झाले. ईडीचे म्हणणे आहे की, कंपनीच्या खात्यांच्या पुस्तकांचे योग्यरीत्या ऑडिट होत नसल्यामुळे तपासात अडचणी येत आहेत, कारण ते आवश्यक आहे. त्यामुळे ईडीने दुसरा मार्ग स्वीकारला असून, कंपनीच्या बँक खात्याच्या स्टेटमेंटवरून तपास केला जात आहे. ईडीने अनेक व्यक्तींच्या वैयक्तिक तक्रारींच्या आधारे बायजूच्या विरोधात तपास सुरू केला होता.

हेही वाचाः Money Mantra : बनावट जीएसटी बिल कसे ओळखावे? एकदम सोप्या पद्धतीनं खऱ्या अन् खोट्या बिलाची ओळख पटवता येणार

रवींद्रन बायजू हे समन्स मिळाल्यानंतरही पोहोचले नाहीत

तपासादरम्यान ईडीने कंपनीचे संस्थापक आणि सीईओ रवींद्रन बायजू यांना अनेक समन्स बजावले. मात्र, ते नेहमी टाळाटाळ करीत होते आणि तपासादरम्यान ते कधीही दिसले नाहीत. कंपनीचे म्हणणे आहे की, त्यांना अद्याप या संदर्भात ईडीकडून कोणतेही अधिकृत निवेदन मिळालेले नाही.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ed caught byjus big scam 9000 crore fraud revealed vrd

First published on: 21-11-2023 at 18:50 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×