मुंबई : समभागसंलग्न अर्थात इक्विटी म्युच्युअल फंडांनी सरलेल्या ऑगस्ट महिन्यात ३८,२३९ कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित केली. नवीन फंड योजनांमुळे ‘थीमॅटिक फंडां’कडे वाढलेला ओढा कायम असल्याने हा गुंतवणूक ओघ वाढल्याचे असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया अर्थात ‘ॲम्फी’ने मंगळवारी जाहीर केलेल्या आकडेवारीने स्पष्ट केले.

‘ॲम्फी’ने प्रसृत केलेल्या आकडेवारीनुसार, ऑगस्टमध्ये इक्विटी फंडात सलग ४२ व्या महिन्यांत गुंतवणुकीचा सकारात्मक ओघ राहिला आहे. आधीच्या (जुलै) महिन्याच्या तुलनेत त्यात ३.३ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. आतापर्यंत एकाच महिन्यात झालेली ही दुसऱ्या क्रमांकाची उच्चांकी गुंतवणूक आहे. याआधी जून २०२४ मध्ये ४०,६०८ कोटी रुपयांची उच्चांकी गुंतवणूक झाली होती. समभागसंलग्न म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा ओघ सलग चौथ्या महिन्यांत ३४ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक राहिला आहे.

over 31 percent return from balanced advantage fund in one year
एका वर्षात बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज फंडातून ३१ टक्क्यांहून अधिक परतावा
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
pn gadgil jewellers ipo get huge response on day one
पीएनजी ज्वेलर्सच्या ‘आयपीओ’त पहिल्या दिवशी दोन पटीने भरणा
gp parsik sahakari bank crosses business of rs 6500 crore
जीपी पारसिक बँकेचा एकूण व्यवसाय ६,५८५ कोटींवर
Eknath shinde ajit pawar (2)
ShivSena vs NCP : “आजच्या घटनेमुळे शिंदे गट बदनाम झालाय”, अजित पवार गटाची टीका; महायुतीत वादाची ठिणगी?
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
Narendra Modi Subhash Desai
Narendra Modi : “मला ८४ हजारांची पेन्शन मिळते, मोदींना किती रुपये मिळतील माहितीय का?”, सुभाष देसाईंनी सगळी आकडेवारी मांडली

हेही वाचा >>> जीपी पारसिक बँकेचा एकूण व्यवसाय ६,५८५ कोटींवर

एकंदरीत म्युच्युअल फंड उद्योगाने १.०८ लाख कोटी रुपये गेल्या महिन्यात आकर्षित केले. आधीच्या महिन्यात ही रक्कम १.९० लाख कोटी रुपये होती. देशात कार्यरत सर्व म्युच्युअल फंड घराण्यांच्या व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता ऑगस्टअखेरीस ६६.७ लाख कोटी या ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. ही मालमत्ता जुलैअखेरीस ६५ लाख कोटी रुपये होती. इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ईएलएसएस) हा प्रकार वगळता फ्लेक्सी कॅप, लार्ज व मिड कॅप आणि स्मॉल कॅप प्रकारच्या फंडात गुंतवणुकीचा ओघ चांगला दिसून आला.

नियोजनबद्ध गुंतवणुकीचा पर्याय असलेल्या सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स अर्थात ‘एसआयपी’च्या माध्यमातून ऑगस्ट महिन्यात २३,५४७ कोटी रुपयांची उच्चांकी गुंतवणूक झाली. याआधी जुलै महिन्यात २३,३३२ कोटी रुपयांची उच्चांकी गुंतवणूक झाली होती. यातून गुंतवणूकदार नियोजनबद्ध आणि दीर्घकालीन गुंतवणुकीला पसंती देत असल्याचे निदर्शनास येत आहे. – वेंकट चालसानी, मुख्याधिकारी, ॲम्फी